महाराष्ट्र

Lok Sabha Election : चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?

Buldhana Constituency : योगी आदित्यनाथ यांच्या सभेने महायुतीचा प्रचार नारळ फुटणार

Shiv Sena : एकीकडे शेती, पाणी, नोकर्‍या आणि जिल्ह्याचा विकास हे मुद्दे पेटले असताना लोकसभा निवडणुकीत भाजप व त्यांचे सहयोगी पक्ष ‘हिंदूकार्ड’ चालवणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामळे बुलढाण्यातील महायुतीच्या प्रचारसभांचा नारळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेने फुटणारआहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्याही सभांचे नियोजन केले जात आहे. योगी आदित्यनाथ एप्रिच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात सभा घेण्याची शक्यता आहे.

महायुतीच्यावतीने मावळतेसदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळालेली आहे. जनमत त्यांना अनुकूल नसल्याचे दिसत असले तरी नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी यांच्या सभानंतर वातावरण बदलू शकते असा राजकीय अंदाज आहे. त्यामुळे भाजप व महायुतीचा महोल बनविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेने महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.

योगी आदित्यनाथ हे एप्रिलच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात बुलढाण्यात सभा घेतील. या निमित्ताने त्यांचा विदर्भातील पहिलाच दौरा राहणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात मतदान होणार आहे. प्रतापराव जाधव यांची लढत शिवसेना उद्धव ठाकरे गटापचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्याशी मानल्या जात आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकरही आपला जालवा दाखवित उसंडी घेऊ शकतात. वास्तविक पाहाता बुलढाण्यातील चौरंगी-पंचरंगी लढतीत प्रतापराव जाधवविरुद्ध इतर सर्व असा सामना होणार आहे.

‘वंचित’ही मैदानात

वसंत मगर यांना वंचित बहुजन आघाडीने मैदानात उतरविल्याने माळी व प्रकाश आंबेडकरांना मानणार्‍या बहुजन समाजाची मते त्यांच्याकडे जाणे क्रमप्राप्त आहे. ही बहुतांश मते प्रतापराव जाधव यांची हक्काची मते होती. त्यातच विजयराज शिंदे हे मैदानात राहिले तर भाजप व हिंदुत्ववादी मतेही शिंदे खेचू शकतात. त्याचाही फटका जाधवांनाच बसणार आहे. त्यामुळे प्रतापराव जाधव यांची सर्व भीस्त ही आता भाजपच्या स्टार प्रचारकांच्या सभांवर राहणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!