महाराष्ट्र

Yavatmal : बँकेच्या कक्षाला कुलूप लावून कर्मचाऱ्यांना डांबले

Angry Farmers : कर्ज वाटपात दिरंगाई, शेतकऱ्यांचा रोष

Yavatmal News कर्जाचे वाटप केले नाही म्हणून यवतमाळ जिल्ह्यात कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँक निरीक्षकांच्या कक्षाला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले. पेरणीचे दिवस जवळ आले असताना तालुक्यातील एकाही सेवा सोसायटीने पीक कर्जाचे वाटप केले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

कक्षात बँकेचे उपसरव्यवस्थापक प्रफुल्ल येंडे, बँक निरीक्षक गजानन कापनवार, नीरज भालकर, वसुली अधिकारी अभय कदम होते. या घटनेची माहिती मिळताच मुंबई बाजार समितीचे संचालक तथा कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, बँकेचे संचालक बाबू पाटील वानखेडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे तातडीने कळंब बँकेच्या शाखेत पोहोचले. त्यांनी सोसायटीचे सचिव, बँक कर्मचारी आणि कुलूप ठोकणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेतली व आज, मंगळवारपासून कर्ज वाटप करण्याची ग्वाही दिली.

केवळ 8 टक्के कर्ज वाटप

मे महिना संपत आला तरीही पीककर्ज वाटपाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कक्षात कोंडून संताप व्यक्त केला. केवळ 8 टक्के कर्ज वाटप झाले आहे. मे महिना संपत आला तरी 92 टक्के कर्ज वाटप व्हायचे आहे. तर कर्ज वाटप करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले.

शेतकरी उद्रेकाच्या विविध घटना

पीक कर्ज वाटपात विलंब, बियाणे मिळण्यासाठी अडचणी यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. कळंब येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाद्वारे बँक अधिका-यांना कर्ज वाटप गतीने करण्याचा इशारा दिला.

Devendra Fadnavis : ऊर्जा मंत्री, सुरळीत विजेची खात्री देतील का ?

तर अकोट मध्ये महिला शेतकऱ्यांमध्ये हाणामारी

जिल्ह्यातील अकोट येथे कापसाचे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर रांगेत असलेल्या शेतकरी महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमातून व्हायरल झाला. एका कृषी केंद्रावर हा प्रकार घडला. कापसाच्या अजित 155 बियाण्यासाठी जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. ऊन आणि पाण्याविना शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. मात्र नंबर लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती केवळ 2 पॅकेट बियाणे मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!