महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Election : महायुतीतील घटक पक्षांचा समन्वय यश हमखास मिळवून देईल

Chhagan Bhujbal : महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा

Nashik, yeola : राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष आहे. तसेच महायुतीतील घटक पक्षांचा समन्वय डॉ.भारती पवार यांना यश मिळवून देईल असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यां समोर ते बोलत होते. 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार केंद्रीय राज्य मंत्री खासदार डॉ.भारती पवार यांच्या प्रचारार्थ येवला कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. भारती पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,येवला बाजार समितीचे सभापती किसनकाका धनगे, अरुण थोरात, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, हरिश्चंद्र भवर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, भोलानाथ लोणारी, शहराध्यक्ष दीपक लोणारी, महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान, मोहन शेलार, दत्तूपंत डुकरे, दत्तात्रय रायते, सचिन दरेकर, शिवाजी सुपनर, प्रा. ज्ञानेश्र्वर दराडे, डॉ.क्षत्रिय, डॉ.जाधव, बाळासाहेब पुंड, गोरख शिंदे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काय म्हणाले छगन भुजबळ 

येवला विधानसभा मतदार संघात विकासाची कोट्यवधी रुपयांची कामे झाली. तसेच पाणी पुरवठा योजना, जलसिंचनाचे प्रकल्प, पर्यटन, रस्ते यासह अनेक महत्त्वाची कामे प्रगतीपथावर आहे. येवला टँकर मुक्त करण्यासाठी अनेक पाणी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. येवल्याच्या विकासासाठी आपण नेहमीच कटिबध्द आहोत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ही विधानसभेचीच निवडणूक असल्याचे डोळ्यासमोर ठेऊन काम करावे असे आवाहन त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

ते म्हणाले, कांद्याचा प्रश्न सध्या अतिशय ज्वलंत बनला आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी आपण वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. कांदा प्रश्नावर कायम स्वरुपी तोडगा निघावा यासाठी आपण राज्य आणि केंद्र सरकारकडे पत्राद्वारे पाठपुरावा केलेला आहे.

ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बूथ यंत्रणा मजबूत करा. शहरातील पदाधिकाऱ्यांनी शहराची तर ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावाची जबाबदारी घेऊन काम करावे. महिलांनी देखील महत्वपूर्ण योगदान द्यावे. तसेच महायुतीतील घटकांची एकी तुटता कामा नये असे आवाहन त्यांनी केले.

Education Department : शिक्षण विभागाला अपडेटची अॅलर्जी

यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र भवर, साहेबराव मढवई, ज्येष्ठ नेते अरुण थोरात सरपंच दत्तात्रय डुकरे, मोहन शेलार, अशोक नागरे यांनी मनोगत व्यक्त केले. तर बाळासाहेब लोखंडे यांनी आभार व्यक्त केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!