Assembly Election : बुलढाणा १७ व्या विधानसभा निवडणुकीत महिलांचा मतदानातीत टक्का हा लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल ४ हे ८ टक्क्यांनी वाढल्याचे चित्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या परिणामामुळे तर महिलांचा टक्का वाढल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे. परंतु नागरिकांमध्ये मात्र मतदानाबाबत जागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचाही हा परिणाम असल्याचे एकंदरीत चित्र दिसते.
महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब महिलांना प्रतिमाह दीड हजार रुपये मिळाले. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीचा मुद्दा चांगलाच गाज्झता होता. दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांत झालेल्या मतदानाची सायंकाळी पाच वाजेपर्यंतची टक्केवारी पाहिली तर त्यात महिलांच्या मतदानाचा टक्का हा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महिलांच्या टक्केवारीशी तुलना करता तब्बल ४ ते ८ टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे.
मलकापूर विधानसभा रावेर लोकसभेमध्ये असल्याने त्याची सविस्तर आकडेवारी उपलब्ध झाली नाही, परंतु मलकापूर विधानसभा मतदारसंघातही हा टक्का काढलेला असण्याची शक्यता आहे. त्यातही बहीण योजनेचा हा इफेक्ट आहे किंवा नाही हे निश्चित सांगता येणार नाही. परंतु निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठे प्रयत्न केले होते. स्वीप उपक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालयातही जनजागृती केली होती. त्यामुळे कदाचित या दोन्हीचा इफेक्ट महिलांच्या मताचा टक्का वाढण्यामध्ये झाला असण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता त्यामुळे लोककीय योजनांसाठी महायुती आग्रही होती, त्या अनुषंगानेद निवडणूकीच्या सौडावर काही योजनाही त्यांनी आपल्या होत्या त्यात लाडकी बहीण गोजनेची चांगलीच चर्चा झाली होती. त्याचा इफेक्टही या मतदानात झाला असावा, असा कयासही व्यक्त केला आत आहे. बुधवारी सकाळपासून महिलांचा टनका मतदानाच्या प्रक्रियेत वाढलेलाच दिसत होता.
Assembly Election : बुलढाणा जिल्हा सत्तर पार; सरासरी 70.32 टक्के मतदान
२०१९ च्या तुलनेतही टक्का वाढला!
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सातही विधानसभा मतदारसंघात ६ लाख १६ हजार ४१३ महिलांनी मता महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्या तुलनेत २०२४ व्या विधानसभा निवडणुकीत ६ लाख ६३ हजार २९२ महिलानी मतदानाचा हक्क बजावला आहे. ही केवळ पाच वाजेपर्यंतची आकडेवारी आहे. त्यामुळे त्यात निश्चितच बदल होणार आहे. परंतु पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीचा विचार करताही महिलांच्या मतदानाचे प्रमाण २०१११ टाक्यांनी वाग्ले आहे. अंतिम आकडेवारी मिळाल्यानंतर महिलांच्या मतदानाचा आकडा आणखी वाढणार असल्याचे संकेत आहेत.