महाराष्ट्र

Maharashtra Assembly : लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल करताना घ्यावी काळजी

Monsoon Session : अन्यथा अर्ज बाद होणार

Ladli Bahin Yojna : मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजने’च्या अर्जाच्यासोबत हमीपत्र देखील जोडण्यात आले आहे. या हमीपत्रात महिलांना काही गोष्टींची हमी देणे बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे हे हमीपत्र वाचले, तर या योजनेबाबतच्या काही गोष्टी जास्त स्पष्टपणे समजतात. नीट वाचून अर्ज न भरल्यास, अर्ज रद्द होण्याची शक्यता अधिक आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळेल त्यांच्यासाठी अनेक अटी ठेवण्यात आल्या आहेत. यातील महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. संबंधित महिलेच्या कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता नसावा. महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावा. तसेच महिलेने शासनाच्या कोणत्याही योजनेचा 1500 पेक्षा जास्त रुपयांचा आर्थिक लाभ घेतलेला नसावा. हे सर्व अर्जाच्या हमीपत्रातून स्पष्ट होत आहेत. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या सर्वच महिलांचे अर्ज पात्र होणे तितके सोपे नाहीत. कारण प्रत्येक नियम या अर्जात पाहिले जाणार आहेत. नियमात बसत असणाऱ्या लाभार्थी आणि गरजू महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे.

 ही घ्या काळजी

माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम / मंडळ / भारत सरकार किवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही, किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार नाहीत.

माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन / बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष / उपाध्यक्ष / संचालक / सदस्य नाहीत. माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत. मी वरीलप्रमाणे घोषित करते की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना संबंधित पोर्टल अॅपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आणि आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रीक किंवा यतः टाइम पीन (OTP) माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल.

मी हे देखील सहमती देते की, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना माझी ओळख पटविण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करु शकतात.

Gondia Politics : साहेबांच्या गटामुळे महाविकास आघाडीत पेच

मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई- केवायसी (e-KYC) वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. वरील सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे, काळजीपूर्वक अर्ज भरून सहमती दिली तर ताई चा अर्ज ग्राह्य जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!