महाराष्ट्र

Lok Sabha Election : थकलेल्या प्रचारकांनी काँग्रेसला जिंकता येईल का? 

Congress : स्टार प्रचारकांच्या यादीत वयस्कर नेतेही

Congress news : लोकसभा मतदारसंघाची व्याप्ती पाहता चांगलीच दमछाक होते. त्यासाठी नव्या दमाचे शिलेदार हवे असतात. वयोमानानुसार थकलेले प्रचारक किती जोर लावू शकतील हा प्रश्नच राहतो. परंतु काँग्रेसने महाराष्ट्रातील तिसऱ्या फेजसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे आहेत. याबाबत विरोधक मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. 

एका लोकसभा मतदारसंघात किमान चार पाच विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असतात. तसेच 18 ते 20 लाख किंवा त्याहून अधिक देखील मतदार असतात. त्यासाठी प्रचारसभा घ्यायच्या, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी संपर्क, तेथील राजी नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. नाही म्हटले तरी वय आणि कार्यबाहुल्याचा परिणाम जाणवतो.

तसेच ऐन उन्हाळ्यात निवडणूक होत आहे. विदर्भात सध्या चांगले तापत आहे. त्यामुळे थकवा जाणवतो. अशा स्थितीत तरुण आणि नव्या दमाचे स्टार प्रचारक राहणे सोयीचे होते. अशा वेळी माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे यांना मर्यादा येणे साहजिक आहे. काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी समाजमाध्यमावर दिसल्याने विरोधक वयस्क स्टार प्रचारकांविषयी बोलत आहेत.

Lok Sabha Election : भाजपच्या काळात एकातरी मुस्लिमाला पाकिस्तानात जावे लागले का? 

अनुभव दांडगा आहेच

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे यांच्या अनुभवा विषयी कोणालाही शंका असण्याचे कारण नाही. माणिकराव ठाकरे यांचे तेलंगणा राज्यात काँग्रेसला विजयी करण्यात महत्त्वाचे योगदान राहिले आहे. परंतु वाढते वय, रणरणत्या उन्हाचा परिणाम होतो. प्रचारात प्रत्येक ठिकाणी पंखे, कूलर, एसी राहतील ही शक्यता नसते. तसेच पक्षाने देखील थकलेल्यांचा विचार करून जबाबदारी देणे श्रेयस्कर ठरते. अर्थात हा काँग्रेसचा अंतर्गत मामला असला तरी विरोधक चर्चा करणारच.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!