Political War : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामुळे अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत नवाब मलिक यांच्यापासून अंतर राखले होते. पण, मंगळवारी 2 जुलै रात्री अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला नवाब मलिक यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनापूर्वी नवाब मलिक यांची ईडीच्या कोठडीतून सुटका करण्यात आली होती. सभागृहात येताना ते सत्ताधारी बाकांवर बसले होते, यातूनच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या सोबत असल्याचा संदेश त्यांनी दिला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना जाहीर पत्र लिहून नवाब मलिक यांच्या समावेशावर नाराजी व्यक्त केली होती.
स्पष्टीकरण गरजेचे
3 जुलै रोजी विधान सभेच्या आवारात या विषयावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार बोलत होते. आताच्या सरकारमध्ये घोळ आहे, अर्थमंत्री अजित पवार हे बजट मांडतात आणि दुसरी कडे बजट सुरू असताना मुख्यमंत्री घोषणा करतात. कुरघोडीचे राजकरण तिघांमध्ये सुरू आहे. त्यांचे भांडण पराकोटीला गेले आहे.
Maratha Reservation : मराठा संघटना आक्रमक; जरांगेंना झेड ‘प्लस सिक्युरिटी’ द्यावी..
आता जर उमेदवार निवडून आणायचे असेल तर नवाब मलिक यांच्या मदतीची गरज आहे, म्हणुन त्यांनीं नवाब मलिक यांना बोलावले असणार. नवाब मलिक त्यांच्या सोबत आहे की नाही, या गोष्टीचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, असे विधान विरोध पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
निवडणुकीसाठी फडणवीस यांना सर्वच गरजेचे आहे, महायुतीने हे स्पष्ट करावे की नवाब मलिक तुमच्या सोबत आहेत का? याचें उत्तर द्या असे ते म्हणाले .
राष्ट्रवादीच्या नेत्या मनीषा कायंदे या प्रकरणावर आक्रमक झाल्या, अजित पवार यांनी या बाबत उत्तर द्यावे असे त्या म्हणाल्या.