संपादकीय

Maharashtra Politics : ‘तुतारी’ फुंकण्यास अनेक इच्छुक

Assembly Election : निवडणुकीपूर्वी राज्यात पक्षांतराचे वारे

 या लेखातील मते ही लेखकांची आहेत. ‘द लोकहित’ या मतांशी सहमत असेलच असेल नाही.

NCP : बहुतेक राजकीय नेते सोयीनुसार आपली भूमिका बदलताना दिसतात. अलिकडे हे प्रमाण वाढले आहे. सक्रिय राजकारणात असलेल्या नेत्यांना सतत सत्तेची स्वप्ने पडत असतात. जिथे सत्तेची संधी आहे, तिथे ते धाव घेतात. त्यामुळे कोणत्या पक्षाचा नेता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाईल, याची शाश्वती राहिलेली नाही. आता तर निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात काही महत्वाचे नेते संधीच्या शोधात पक्षांतर करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अनेकांचे आश्रयस्थान होत आहे. राजकीय परिस्थितीचा वेध घेता या पक्षाची उमेदवारी मिळावी, म्हणून अनेक जण प्रयत्नशील आहेत. काही नेत्यांना तर या पक्षाची मिळालेली उमेदवारी विजयाची हमी वाटत आहे.

राज्यात सत्तारूढ असलेल्या महायुतीमधील (Mahayuti) काही नेत्यांची सध्या चलबिचल सुरू आहे. घटक पक्षातील दुसऱ्या उमेदवाराला जागा सुटल्यास कुणाचीतरी संधी हुकणार आहे.

काहींना ही चाहूल आधीच लागली आहेत. आपल्याला हमखास संधी देईल, अशा पक्षांचा ते शोध घेत आहेत. या परिस्थितीत मोठ्या साहेबांचा अर्थात शरद पवार या़चा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना जवळचा वाटतो आहे.

भाजपची सोडली साथ

काही प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली आहे. ते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. इंदापूरचे माजी मंत्री, आमदार हर्षवर्धन पाटील हे त्यातील प्रमुख नाव आहे. महायुतीमधील ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे गेल्याने त्यांचा पत्ता कटला. आता ते शरद पवार यांच्या पक्षाकडून तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. आपण निवडणूक लढवावी, हा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, असे ते आता सांगत आहेत.

भाजप नेते समरजितसिंग घाडगे कोल्हापूरमधून (Kolhapur) हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत. घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात अलिकडेच प्रवेश केला आहे. चंदनगड येथील भाजप नेते शिवाजी पाटील तसेच नगरच्या अकोले येथील पिचड पितापुत्र शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. वडगाव शेरी येथील भाजपचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी काही माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. प्रत्येकांसोबत त्यांचे समर्थक ही आहेत.

Shiv Sena : आमदार देशमुखांकडून जुन्या आरोपांच्या शिळ्या कढीला ऊत

दादांना काळजी

अजित पवार गटाच्या ज्या आमदारांना तिकीट नाकारले जाईल, ते पक्षांतर करू शकतात. शरद पवार यांच्या पक्षात त्यांना सहज प्रवेश मिळू शकतो. शेवटच्या टप्प्यात अशाप्रकारचे पक्षांतर वेग घेऊ शकते. त्यामुळे अजित पवार यांची काळजी वाढली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हांचा वाद न्यायालयात सुरू आहे. ‘घड्याळ’ हे चिन्ह आपल्या मूळ पक्षाला मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आली आहे. चिन्ह गोठवले गेल्यास नवीन समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे अजित पवार गटाचे काही आमदार घरवापसी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतर पक्षांना आणखी धक्के बसतील असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी नुकतेच केले आहे.

अजित पवार महायुतीसोबत आहेत. भाजपसोबत (BJP) हातमिळवणी करून फार काही साध्य झाले नाही. मूळ पक्षातून बाहेर पडल्याने वेगळ्याच समस्यांचा सामना ते करत आहेत. प्रयोग फसल्याने हतबल झालेल्या अजितदादांना भूकंपाचे वेगळे हादरे बसू लागले आहेत. हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयावर काही प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

सत्ता महायुतीचीच?

मूळ पक्षाने आपल्याला काय दिले, याचा विचार करणे गरजेचे आहे. सध्या राजकारणात आपल्याला काय मिळणार, हा प्रकार वाढला आहे. बरेचदा तो अभ्यासही ठरतो. आपण आहोत त्या पक्षात राहिलो तर आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठा टिकून राहते, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नोंदविली. राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. तेव्हा पुन्हा पक्षात येण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली तर पक्ष त्यांना पक्षात घेईल की, नाही हे सांगता येत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. महाराष्ट्रात ऐंशीच्या दशकात पक्षाबदल करून सत्तांतर घडवून आणले गेले. पहिली टाळी कोणी वाजवली, याचा विचार करा असे सुचक विधान त्यांनी केले.

NCP Sharad Pawar : चंद्रपुरात धक्का; पोंभुर्णाचे ओबीसी तालुकाध्यक्ष भाजपात

ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया नोंदवली. ‘बाबुल की दुवाए लेती जा..’ हे गीत वाजवा, असे त्यांनी सुचविले. हर्षवर्धन पाटील पहिले काँग्रेसमध्ये (Congress) होते. नंतर अपक्ष म्हणून लढले. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ते युतीसोबत होते. आता त्यांनी तुतारी हाती घेतली. ती वाजली पाहिजे, नाहीतर पश्चात्तापाची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

एक दोन जण पक्ष सोडून गेले तर चर्चा होते. आमच्याकडे शिवसेनेचे , आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 40-40 आमदार आले. त्यांची चर्चा झाली नाही, असा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी हाणला. भाजपचे अन्य नेते पक्षांतर करण्याचे मन:स्थितीत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. काहीही असो, या घटनेमुळे तुतारी फुंकण्यास अनेक जण उत्सुक दिसत आहेत. शरद पवार यांची अलिकडील काही सूचक विधाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या छातीचे ठोके वाढवित आहे.

विशेष म्हणजे तिसऱ्या आघाडी विषयीची मिश्किल टिप्पणी चर्चेचा विषय ठरली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!