महाराष्ट्र

Congress : विधानसभेत मुस्लिम उम्मेदवार वाढणार?

Legislative Assembly Elections : महाविकाघाडीवर दबआणण्याची रणनती; पक्षश्रेष्ठींसाठी कसरत

Political News : लोकसभा निवडणुकीमध्ये ‘ मुस्लिम-दलित–मराठा’ अशी मतपेढी महाविकास आघाडीच्या बाजूला झुकल्याचे दिसले. आता मुस्लिम लोकसंख्या गृहीत धरुन प्रत्येक जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघात उमदेवारी मिळावी अशी मागणी काँग्रेसकडे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अलिकडेच छत्रपती संभाजीनगर येथे या अनुषंगाने एका बैठकीचे अयोजन करण्यात आले. काही माजी आमदारांनी यामध्ये पुढाकार घेतला.

लातूर येथे १० ऑगस्ट रोजी काँग्रेस नेत्यांची विभागीय बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेनीथल्ला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते येणार आहेत. या बैठकीत ही मागणी अधिक जोरकसपणे मांडण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. मुस्लिमांना विधिमंडळात काँग्रेसने अधिक प्रतिनिधीत्व द्यावे ही मागणी पुढे रेटण्यासाठी माजी आमदार एम. एम. शेख, माजी आमदार सिराज देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईज शेख, मराठवाडा विभागीय अध्यक्ष अहमद चाऊस, युसुफ शेख, धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद, नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार शेख, उपमहापौर मसूर शेख, प्रदेश सरचिटणीस हाफिज शेख, प्रदेश सचिव खलील पठाण, प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, प्रदेश सरचिटणीस कैसर आझाद, शकील मौलवी, रशीद मामू, आरिफ शेख यांनी पुढाकार घेतला आहे. या प्रश्नी राहुल गांधी यांची भेट घेण्याची तयारी असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोईज शेख यांनी सांगितले.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संधी

मराठवाड्यात नांदेडमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली होती. काँग्रेस बरोबरच राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटानेही मुस्लिमांना प्रतिनिधीत्व दिले जाईल असे संकेत दिले आहेत. परभणीच्या बाबा जानी यांना नुकतेच पुन्हा एकदा पक्षात प्रवेश देण्यात आला. फौजिया खान देखील राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्या मानल्या जातात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी देताना हात आखडते ठेवले जातात असा आरोप नेहमी ‘एमआयएम’चे नेते करत असतात. त्यामुळे मराठवाड्यात मुस्लिम मतपेढीला योग्य प्रतिनिधीत्व मिळावे अशी मागणी वाढत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी या मागणीला अधिक टोकदार करत नेत्यांच्या भेटीगाठीचा उपक्रम हाती घेतला आहे.

Bangladesh Crisis : नोबेल विजेते मोहम्मद यूनुस करतील बांगलादेशचे नेतृत्व

विधानपरिषदेत मुस्लिम आमदारांची संख्या शून्य!

विधान परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी या निवडणुकीसाठी त्यांचे उमेदवार जाहीर केले. मात्र, यामध्ये एकही मुस्लिम उमेदवार नाही. अशातच महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकही मुस्लिम प्रतिनिधी नसल्याची बाब समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी यापूर्वीच निदर्शनास आणून दिली होती. राज्यातील मुस्लिम नेत्यांना विधानसभा आणि विधान परिषदेवर संधी देऊन मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व निर्माण करावं, असंही त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी आणि काँग्रेसचे मिर्झा वजाहत हे विधान परिषदेतील दोन आमदार निवृत्त झाल्यामुळे विधान परिषदेतील मुस्लिम प्रतिनिधींची संख्याशून्य झाली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!