महाराष्ट्र

Harish Alimchandani : जनसेवेचं व्रत कायम ठेवणार

Akola Politics : मनापासून नरेंद्र मोदी, हिंदुत्वावर प्रेम करत राहणार 

Stand After Election : विधानसभा निवडणूक आता आटोपली आहे. महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं आहे. निवडणुकीदरम्यान अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठा पेच निर्माण झाला होता. भारतीय जनता पार्टीनं ऐनवेळी पत्ता कापल्यानं माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. वंचित बहुजन आघाडीनं त्यांना पाठिंबा दिला होता. आता निवडणूक आटोपली आहे. निवडणुकीनंतरही आपलं जनसेवेचं व्रत कायम राहणार असल्याचं हरीश अलीमचंदानी यांनी स्पष्ट केलं आहे.

आपण भारतीय जनता पार्टीत कार्यरत होतो. आपण कोणालाही पराभूत करण्यासाठी निवडणूक लढविली नव्हती. आपण विजय मिळविण्यासाठी निवडणूक लढविली होती. निवडणूक आटोपली आहे. राजकीय क्षेत्रात येण्याआधीपासून आपण सामाजिक क्षेत्रात कार्यरत होतो. थॅलेसिमिया सोसायटीच्या माध्यमातून आपण अनेकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशीच जनसेवा कायम राहणार असल्याचं अलीमचंदानी यांनी सांगितलं. आपण नरेंद्र मोदी आणि हिंदुत्व यावर मनापासून प्रेम करतो. त्यामुळं भविष्यातही आपण हे प्रेम कायम ठेवणार असल्याचं अलीमचंदानी यांनी स्पष्ट केलं.

सध्या सामाजिक कार्य

लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होण्याचे संकेत आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालायनंही हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे अकोल्यातील महापालिका निवडणुकीत कोणती भूमिका असणार हे देखील अलीमचंदानी यांनी सांगितलं. अलीमचंदानी म्हणाले की, भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल अद्याप काहीही ठरविलेले नाही. आधी सांगितल्याप्रमाणे आपण नरेंद्र मोदी आणि हिंदुत्वावर प्रेम करीत राहणार आहे. तूर्तास कोणत्याही अन्य राजकीय पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. तशी इच्छाही नाही. त्यामुळं महापालिका निवडणुकीबद्दल आताच काही सांगता येणार नाही. कालांतरानं यासंदर्भात योग्य तो निर्णय घेता येईल, असंही ते म्हणाले.

निवडणूक लढविण्यापूर्वी हरीश अलीमचंदानी हे भारतीय जनता पार्टीत होते. निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतरही अलीमचंदानी यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. निवडणूक आटोपल्यानंतर आद्याप भाजपकडून अलीमचंदानी यांच्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अलीमचंदानी यांच्याकडूनही भाजपमध्ये परत जाण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाही.

Harish Alimchandani : मग मी हिंदू नाही तर कोण?

राजकारणात कोणासाठीही सदासर्वकाळ दरवाजे बंद नसतात. त्यामुळं भाजप कायमसाठी अलीमचंदानी यांच्यासाठी दरवाजे बंद ठेवेल असं वाटत नाही. महापालिका निवडणूक जवळ आल्यानंतर कदाचित हे दरवाजे उघडले जाऊ शकतात, असे संकेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळाले आहेत. त्यामुळं अलीमचंदानी यांना भाजपसोडून अन्य पक्षात जाण्याचं काम पडणार नाही, असं सांगण्यात येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!