Nagpur constituency : मध्य नागपूरमध्ये भाजपचे विकास कुंभारे यांची धाकधुक वाढली आहे. पण तशीच परिस्थिती काँग्रेसची आहे. कारण कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालायची, असा प्रश्न नेत्यांपुढे निर्माण झाला आहे. यामध्ये गेल्यावेळी विकास कुंभारे यांना काट्याची टक्कर देणारे बंटी शेळके यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना पुन्हा संधी देऊन विजयासाठी जोरदार प्रयत्न करण्याचा निर्धार काँग्रेस करत आहे. मात्र, त्याचवेळी इतर इच्छुकांनीही नेत्यांपुढे पेच निर्माण केला आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
विकास कुंभारे यांचा मध्य नागपूर गड
सलग तीन टर्म विकास कुंभारे यांनी मध्य नागपूरचा गड भाजपकडे ठेवला आहे. त्यापूर्वीच्या सात निवडणुका काँग्रेस आणि एक निवडणूक जनता दलाच्या उमेदवाराने जिंकली आहे. त्यामुळे पूर्वी मध्य नागपूर हा काँग्रेसचाच गड मानला जात होता. पण विकास कुंभारे यांच्या रुपात हलबा समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आणि मध्यचे चित्रच पालटले. आजही हलबा समाजाची 60 हजाराहून अधिक मते मध्य नागपुरात आहेत. पण गेल्या निवडणुकीत कुंभारे यांच्याबद्दलचा भाजपमध्ये असलेला रोष बंटी शेळके यांच्या पथ्यावर पडला. शेळके विजयी झाले नाही. त्यांची कामगिरी दखल घेण्यासारखी ठरली.
2019 मध्ये बंटी शेळके यांचा अवघ्या 4 हजार मतांनी पराभव झाला होता. हा विकास कुंभारे यांच्यासाठी विजयी झाल्यानंतरही मोठा धक्का होता. त्यामुळेच आपली पुढच्या वेळी उमेदवारी धोक्यात आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. अर्थात त्यामुळेच महाविकास आघाडीकडून बंटी शेळकेच मध्यचे उमेदवार राहतील, हे यंदाही निश्चिच होते. पण, नंदा पराते आणि रमेश पुणेकर यांनी हलबा कार्ड समोर केले आहे. या मतदारसंघात काँग्रेसने हलबा समाजाकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी नेत्यांकडे व्यक्त केली आहे.
Assembly Election : काँग्रेसच्या पहिल्या यादीत सात जागा होल्डवर!
पाच टर्म मुस्लीम आमदार
मध्य नागपूरमध्ये मुस्लीम बहुल भाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आसिफ कुरेशी, हैदरअली दोसानी यांनी देखील काँग्रेसकडे उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. 11 पैकी 5 निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मुस्लीम उमेदवार विजयी झाला आहे. 1980 मध्ये याकुब कमर खान, 1985 मध्ये शौकत कुरेशी मध्यमध्ये काँग्रेसचे आमदार होते. त्यानंतर 1990, 1995 आणि 2004 अशा सलग तीन निवडणुका अनिस अहमद यांनी जिंकल्या. 2001 ते 2009 या कालावधीत ते मंत्रीमंडळातही होते. त्यामुळे यंदा मुस्लीम समाजाला संधी मिळावी, असा आग्रह धरला जात आहे.