महाराष्ट्र

Lok Sabha Election : गावागावात रंगल्या गप्पा, कोण होणार खासदार!

Prediction : वाढीव मतदानाचा कुणाला फायदा, उमेदवारांकडून विजयाचा दावा!

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेज मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदान आटोपले. मात्र, निकालाला बराच कालावधी बाकी असल्याने विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. गावागावातही याबाबत चर्चा रंगल्या आहेत. या मतदारसंघातील तिहेरी लढतीचा अंदाज बांधणे कठीण झालं आहे. कारण तीनही उमेदवार सरस ठरल्याची चर्चाही सुरू आहे. वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार हे महत्वाचे ठरणार आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात शांततेत पार पडलं. अशातच मतदारसंघात विविध चर्चांना उधाण आले आहे. तर उमेदवारांकडून विजयाचे दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष अकोला लोकसभा मतदारसंघाकडे लागून आहे. येथे वंचित बहुजन आघाडीसह काँग्रेस, आणि भाजपचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीतील अंदाज तंतोतंत खरे ठरायचे. मात्र, या निवडणुकीत अंदाज बांधणे कठीण झाले आहे. याचे कारण म्हणजे वाढलेली मतांची टक्केवारी. तर काँग्रेस कडून मराठा समाजाला देण्यात आलेली उमेदवारी यामुळे बदल पाहायला मिळाला. त्यामुळे मतदार नेमके कुणाच्या बाजूने वळले याचीच चर्चा सध्या होत आहे.

Lok Sabha Election : जिल्ह्यात मोबाइल बंदीचा फज्जा !

वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर!

अकोला लोकसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी केवळ 1.81 टक्के मतांची वाढ नोंदविण्यात आली. मतदारसंघात सरासरी 61.79 टक्के मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणात पंधरा उमेदवार असले तरी खरी लढत महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि महायुती यांच्यातच झाली. विधानसभा क्षेत्रानुसार विचार करता सहा विधानसभा क्षेत्रापैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्‍व असल्यामुळे भाजपच्या गडात कुणाला लीड मिळणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर, प्रत्येकी एक मतदारसंघ हा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. तर दुसरीकडे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात वाढलेलं मतदान कुणाला मिळणार हे ही पाहावं लागणार आहे.

भाजपचा गड असलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले तर सर्वाधिक मतदान हे शिवसेनेचे आमदार असलेले नितीन देशमुख यांच्या मतदारसंघात झाले. दरम्यान वाढीव मतदान हे कुणाचा विजय सुकर करणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!