Vidarbha Political : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दिवंगत काँग्रेस नेते बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या खासदार निवडणूक निकालानंतर आता एक-एक गुपीत उघडू लागल्या आहेत. आपल्या विरोधात राजुऱ्याचे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांना सुपारी दिली गेली असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कुणाचेही नाव न घेता जिल्ह्यातील आणि राज्यातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यावर खळबळजनक आरोप केले. त्या म्हणाल्या की, मला लोकसभेची उमेदवारी नाही मिळाली पाहिजे, यासाठी आमच्याच पक्षातील काही लोकांनी प्रयत्न केले. त्यासाठी आमदार सुभाष धोटे यांना सुपारी देण्यात आली होती. त्यांचा रोख विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Bacchu Kadu : जरांगेंनी विधानसभेत जास्तीत जास्त आमदार निवडून आणावे..
लोकसभेची उमेदवारी तुम्ही मागा. जेणेकरून प्रतिभा धानोरकर या निवडणूक लढू शकणार नाही आणि सुधीर मुनगंटीवार घरी बसल्या निवडून येऊ शकतील, असे आमदार धोटेंना सांगितले गेले. पण धोटे कुठल्याही भुलथापांना बळी पडले नाही. नैसर्गिक न्यायासोबत ते राहिले. अगदी सुरुवातीपासून ते माझ्यासोबत होते. ज्याचा नैसर्गिक हक्क आहे, तिच्यासोबत मी राहील, असे म्हणत त्यांनी योग्य भूमिका घेतली. त्याचाच परिणाम म्हणजे हा विजय आहे, असे खासदार धानोरकर म्हणाल्या.
आमदार धोटे यांना पैसे..
आमच्याच पक्षातील काही लोकांनी आमदार धोटे यांना पैसे देऊन मॅनेज करण्याचेसुद्धा प्रयत्न केले. पण त्यांनी कुठलीही लालसा ठेवली नाही. कुणाच्या खोट्या आश्वासनाला विकले गेले नाहीत. पक्षातील प्रत्येक जण आमदार धोटेंसारखा अ्सला, तर पक्षाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. पण दुर्देवाने आमच्या पक्षात आपल्याच उमेदवाराला पाडण्यासाठी कटकारस्थाने रचतात, असा गंभीर आरोप खासदार धानोरकर यांनी पुन्हा नाव न घेता केला.
आमदाराला मंत्रीपद देणार..
चंद्रपुरातील आमदाराला मंत्रीपद मिळावं, यासाठी प्रयत्न करणार असल्याची मोठी घोषणा खासदार धानोरकर यांनी केली. त्या म्हणाल्या, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या विधानसभा मतदारसंघात तिकीट वाटणार आहे.