देश / विदेश

PM Oath Ceremony : शपथ घेताना चंद्रशेखर पेमसानींनी टाळले देवाचे नाव

NDA Government : शपथविधीसाठी असा आहे प्रचलित नियम

New Delhi : लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर एनडीए सरकार सत्तारूढ झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांनाही शपथ देण्यात आली. मोदींसह 58 मंत्र्यांनी शपथ घेतली. सरकारमध्ये मोदींसह 72 मंत्री आहेत. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार मंत्री आहेत.

36 राज्यमंत्र्यांचाही समावेश मंत्रिमंडळात समावेश आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात द्रोपदी मुर्मू यांनी सर्व मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. मंत्री देवाला साक्षी ठेऊन शपथ घेत होते. शपथ घेताना मंत्री म्हणतात, मी ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, मी कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानाचे पालन करीन.. अशा प्रकारे मंत्र्यांची शपथ देण्यात येत होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सर्वांना शपथ देत होत्या.

पेमसानींनी म्हटले नाही ईश्वर

टीडीपीचे खासदार चंद्रशेखर पेमसानी यांनी शपथ घेतली. त्यांचे शब्द बाकीच्या मंत्र्यांपेक्षा वेगळे होते. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी त्यांच्या शपथेत ईश्वर किंवा देव हा शब्द वापरला नाही. डॉक्टर असलेले व त्यानंतर राजकारणी झालेल्या पेमसानी यांनी इंग्रजीतून मंत्रिपदाची शपथ घेतली. ते म्हणाले, मी डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर शपथपूर्वक सांगतात की, मी भारताच्या संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवीन. म्हणजेच पेमसांनींनी देव हा शब्द वापरला नाही.

राज्यघटनेतील नियम

भारतीय राज्यघटनेत शपथेबाबत नियम आहे. कलम 75 नुसार पंतप्रधानांना राष्ट्रपतींसमोर शपथ घ्यावी लागते. शपथ एका विशिष्ट प्रतिज्ञापत्राचे पालन करते, जे पंतप्रधान वाचतात. स्वीकारतात. शपथेनंतर, अधिकृत प्रमाणपत्र देखील जारी केले जाते. या प्रमाणपत्रात शपथ घेण्याची तारीख आणि वेळ नमूद असते. त्यावर पंतप्रधानांचीही स्वाक्षरी असते.

राज्यघटनेच्या कलमांमध्ये शपथेचे नियम तपशीलवार स्पष्ट केले आहेत. राष्ट्रपतींच्या शपथविधीची संपूर्ण माहिती घटनेच्या कलम 60 मध्ये देण्यात आली आहे. कलम 75 (4) पंतप्रधान आणि मंत्र्यांच्या शपथेचे स्वरूप सांगते. कलम 99 मध्ये संसदेच्या सर्व सदस्यांच्या स्वागतासाठीच्या नियमांची माहिती आहे. कलम 124 (6) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या शपथ घेण्याचे नियम दाखविते. अनुच्छेद 148 (8) नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या शपथविधीसाठीचे नियम सांगते. लोकशाहीत शपथ ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, हे संविधानाच्या वेगवेगळ्या कलमांमध्ये दिलेल्या नियमांवरून स्पष्ट होते.

Narendra Modi Cabinate : कोमेजलेले ‘कमळ’ फुलविण्यासाठी संतुलित मंत्रिमंडळ

एखाद्या व्यक्तीला ईश्वरसाक्ष असे उच्चारायचे नसल्यास त्याची तरतूदही घटनेत आहे. ईश्वरसाक्ष ऐवजी सत्य व निष्ठेवर शपथ घेतो की असा उल्लेखही शपथ घेताना करता येतो. त्यामुळे ज्या व्यक्तींचा देवावर विश्वास नाही त्यांना अशी शपथ घेता येते. ही शपथ मी सत्य व निष्ठापूर्वक शपथ घेतो की.. अशा स्वरूपाची शपथ असते. मात्र कोणतेही पद ग्रहण करताना शपथ घ्यावीच लागते. त्याशिवाय संबंधित पदग्रहण करता येत नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!