प्रशासन

Gondia : भाऊ ऑक्टोबर लागला; धान खरेदी केंद्रांचा तिढा कधी सूटेल?

Paddy crop : लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

Gondia : यंदाच्या खरीप हंगामाचा आता शेवट सुरू झाला आहे. त्यातच हलक्या जातीचे धान पीक येत्या काही दिवसात कापणीवर येणार आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करणे अपेक्षित आहे. ऑक्टोबर महिना लागून आज 7 दिवसाचा अवधी लोटत चालला आहे. जिल्ह्यात अभिकर्ता संस्था असलेल्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सुमारे 1500 आधारभूत हमीभाव केंद्रांवरून धान पिकाची खरेदी करण्यात येते. मात्र अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू होण्याचा हालचाली दिसून येत नसल्याने धान खरेदी केंद्रांचा तिढा कायम आहे. तर दुसरीकडे हलक्या जातीचे धान कापणीला आले असून बळीराजाची दिवाळीही अंधारात जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे 1 लाख 95 हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येते. यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा पावसाची नोंद अधिक झाली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात धान पिकाचे विक्रमी उत्पादन येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनाही अतिरिक्त पावसाचा लाभ झाला आहे. तर दुसरीकडे हलक्या जातीचे धान पीक काही दिवसानंतर कापणीवर येणार आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी विंधन विहिरीच्या माध्यमातून धान पिकाची लागवड केली होती, अशा शेतकऱ्यांची कापणीही सुरू झाली आहे. तसेच तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे धानाची विक्रीही झाली आहे.

Gondia : रेशन दुकानदारास अभय का ?

तर..धान खरेदी केंद्र सुरू

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेपासून आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करावे, असे निर्देश आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून धान भरडाई तसेच गोदामातून धानाची उचल न झाल्याने धान साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात असतांना व त्यातही धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मदत 1 ऑक्टोबर असतांना अद्यापही जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्या वतीने आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली दिसून येत नसल्याने यंदाची दिवाळी बळीराजाची अंधारात जाणार, अशी स्थिती दिसून येत आहे.सद्या राज्यासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात सर्व पक्षाचे पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मात्र बळीराजाला हमीभाव मिळावा व त्यांची दिवाळी आनंददायी व्हावी, त्या अनुषंगाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू व्हावे, यासाठी एकही लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नसल्याने यंदाच्या हंगामात धान खरेदी केंद्रांचा तिढा निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!