महाराष्ट्र

BJP News : महायुतीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?

Mahayuti : भाजपचे 48 नेते 288 मतदारसंघाचा दौरा करणार!

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा दारूण पराभव झाला. अपेक्षित न मिळाल्याने भाजपने आता आगामी विधानसभा निवडणुकीवर फोकस करणे सुरू केले आहे. भाजपचे 48 नेते विधानसभेच्या 288 मतदारसंघात दौरा करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज 19 जून रोजी दिली आहे. 18 जून रोजी दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. यानंतर आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Anup Dhotre : कुमार वर्मा बनण्याला काहीच अर्थ नाही; हिंमत करा, यश तुमचेच असेल

लोकसभा निवडणुकीत भाजपने 45 प्लस चा नारा दिल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धडाका सुरू करण्यात आला होता. मात्र लोकसभेच्या निकालानंतर भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा जिंकता आल्या, तर महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने, आता भाजपने अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.

18 जून मंगळवारी भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत विवीध निर्णय आले, अशी माहिती आहे. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले की, ‘’राज्यातल्या 288 मतदारसंघांत भाजपचे नेते दौरा करणार आहेत. लोकसभेत ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो, त्या ठिकाणी संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विधानसभेसाठी आम्ही आता तयारीला लागलो आहोत’’, असे बावनकुळे म्हणाले. लोकसभेला महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यासाठीच आता भाजपकडून डॅमेज कंट्रोल केले जात आहे.

महायुतीचा मुख्यमंत्री कोण ?

बावनकुळे यांना महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण असेल, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण असेल यावर अद्यापही चर्चा झालेली नाही. मात्र देवेंद्र फडणवीस हे आमचे आणि भाजपचे नेते आहेत. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित दादांचेही सरकार आहे. भाजपचे नेतृत्व फडणवीस आहेत. याबाबत केंद्रीय नेतृत्वाकडून निर्णय होईल’ असे सूचक विधान बावनकुळेंनी केले आहे. त्यामुळे भाजपचा चेहरा देवेंद्र फडणवीस हेच असतील यावर शिक्कामोर्तब झाले असल्याची चर्चा आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!