Lok Sabha Election : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटलं म्हणजे केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वर चर्चा अशातला काही भाग नाही तर विदर्भातील महायुतीच्या जागा संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केली. कारण मी त्यांना भेटून सिंधुदुर्गचा प्रश्न सुटणार नाही याची जाणीव असल्याचे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नागपुरात बोलताना सांगितले.
आम्ही दोघेही महायुतीचा प्रचार करतोय
आशीष शेलार हे महायुतीचा प्रचार करतायत आणि आम्ही देखील महायुतीचाच प्रचार करीत आहोत. त्यामुळे वैयक्तिक कुठलाही प्रचार सुरू नाही असे त्यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
या मतदारसंघांची माहिती दिली
नागपूर मध्ये असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नाही, असे होऊ नये त्यामुळे आज आलो. यवतमाळ, हिंगोली, वाशिम या मतदारसंघाची माहिती मी उपमुख्यमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्र्यां यसोबत उपमुख्यमंत्र्यांचे टेलिफोनवर बोलणे झालेल आहे. कोण कोणाला भेटत नाही, तसेच त्यातून वेगळे अर्थ काढण्याचा भाग नाही हे सामंत यांनी स्पष्ट केले.
वायकर यांच्या उमेदवारी बाबतीत
रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध होत आहे? यावर बोलण्यात इतका मोठा नेता नाही. जो काही निर्णय होईल तो महायुतीतून होईल.
राणे ज्येष्ठ नेते
नारायण हे महायुतीतले ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी माझं मत मांडण योग्य नाही, असे सांगून त्यांनी हा विषय तिथेच संपवला.
संजय राऊत रोज नवीन सांगतात
संजय राऊत यांच्या रोज सकाळच्या पत्रकार परिषदेला एवढ्या गंभीर्याने घेण्याची गरज नाही. तीन दिवसापूर्वी त्यांच वाक्य होतं ते 35 जागा निवडून येतील ते महाराष्ट्राबद्दल नाही, तर देशात इंडियाच्या तेव्हढ्या जागा निवडून येतील असा त्याचा अर्थ होतो.
मी एवढा साहित्यिक नाही की त्यांच्यासारखे शब्द वापरू शकेल. पण त्यांच्या पत्रकार परिषदेला एवढा गंभीर्याने का घेता? उबाठावाले त्यांच्या बोलण्याला गंभीरपणे घेत नाही, त्यामुळे तुम्ही घेऊ नका. आक्षेपार्ह शब्दप्रयोग करण्यासाठी त्यांच्या एवढा मोठा साहित्यिक नाही असे सामंत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या विषयी
कोणी कोणाला संपवण्याचा प्रयत्न करत नाही. स्वतःची कर्म स्वतःला संपवत असतात. त्यांची ज्या पद्धतीने कार्यप्रणाली होती. भाजपबरोबर युती असतानाही काँग्रेसबरोबर गेले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. कोणी कोणाला संपवत नसतो. ज्यावेळी आपण संपत असतो तेव्हा कोणावरतरी खापर फोडायचं असतं, त्यासाठी केलेली ही उठाठेव आहे असे उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सांगितले.
मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार
तोंडाची वाफ घालवण्यापेक्षा, 4 जूनला चित्र स्पष्ट होईल. पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होणार आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस प्रतीक्षा करा असा सल्ला दिला.
भावना गवळी यांना भविष्यात मानाचे स्थान
आजची पत्रकार परिषद ही नाराजीसाठी नाही. मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. त्यांनाही भविष्यात मानाचे स्थान दिले जाईल, हे ही त्यांनी स्पष्ट केले.