महाराष्ट्र

Umesh Patil  : राष्ट्रवादीचा वर्धापनदिन आम्हीच साजरा करणार

NCP : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्ह अजितदादा पवारांना दिले

Mumbai : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिले असल्यामुळे 10 जून हा पक्षाचा वर्धापन दिन आम्ही थाटात साजरा करणारा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली. 

माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, आजही चिन्हाबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे. शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस नावाची पार्टी नाही तर त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी हे स्वतंत्र नाव निवडणूक आयोगाने दिले आहे. आणि चिन्ह देखील तुतारी आहे. त्यामुळे ज्यादिवशी नाव आणि चिन्ह त्यांना मिळाले तो दिवस ते पुढच्या वर्षी पहिला वर्धापन दिन म्हणून साजरा करतील. तो त्यांना अधिकार आहे असेही उमेश पाटील म्हणाले.

25 वा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि अजित पवार यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता तो उत्साहात साजरा करेल असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या नेतृत्वात तारीक अन्वर, पी. ए. संगमा आणि प्रफुल्ल पटेल या राष्ट्रीय नेत्यांनी आणि राज्यस्तरावर मधुकर पिचड, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, अजित पवार, सुनील तटकरे, आर.आर.आबा पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, हसन मुश्रीफ या सर्वांनी पक्ष वाढवला. आज समोरच्या पक्षाकडे ज्या कार्याध्यक्षा आहेत. त्या स्थापनेच्या वेळी संस्थापकसुध्दा नव्हत्या असा टोलाही उमेश पाटील यांनी लगावला.

Congress Meeting :  इंदिराजींच्या आठवणीने प्रियंका गांधी भावूक

त्यापैकी 90 टक्के अजित पवारांसोबत

पक्षवाढीसाठी ज्यांची नावे घेतली त्यातले 90 टक्के लोक अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष ही खाजगी प्रॉपर्टी नाही तर लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाकडे रितसर नोंदणी झालेली व्यवस्था असते. राजकीय पक्ष खाजगी प्रॉपर्टी असती तर दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणी झाली असती. त्यामुळे वंशपरंपरेने खाजगी प्रॉपर्टी ट्रान्स्फर होते तसा राजकीय पक्ष वंशपरंपरेने ट्रान्स्फर होण्याची व्यवस्था नाही. लोकशाही प्रक्रियेत ज्याच्याकडे बहुमत असते त्यांच्याकडे पक्ष जातो, असेही उमेश पाटील यांनी सांगितले.

error: Content is protected !!