Express in Nagpur : वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे. सध्या निवडणूक एका विशिष्ट टप्प्यात आलेली असली तरी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेस तयार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांनी नागपूर येथे बोलताना सांगितले.
अनेक दिवसांपासून जागा वाटपाची चर्चा सुरू राहिली आहे. वंचित सोबत अनेक बैठक झाल्या, महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी चर्चा झाली. तसेच
माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय होत हे सांगता येत नाही. आम्ही शेवट पर्यत चर्चा करण्यासाठी तयार आहोत. मतांचे विभाजन होऊन विरोधकांना त्याचा लाभ होऊ नये ही आमची भूमिका असल्याचे वासनिक यांनी स्पष्ट केले.
तरीही सांगली बाबत आम्हाला विचारता….
जिथे भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात अजून दहा जागांबाबत समाधानकारक चर्चा झाली नाही तरी तुम्ही सांगलीचे काय झाले हे विचारता असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. आमची चर्चा चांगली होत आहे लवकरच तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई, बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. याविरोधात इंडिया आघाडीने रान उठवले आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. देशाला एकसूत्रात बांधण्यात त्यांना यश मिळाल्याचे ठिकठिकाणी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने दिसून आले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विचारधारेला त्याचा निश्चित लाभ होईल असेही मुकुल वासनिक म्हणाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी आमचे प्रदर्शन उत्तम झालेले असेल असे वासनिक म्हणाले.