महाराष्ट्र

Devendra Fadnavis : वजनदार, दमदार अन् आता झाले पाणीदार 

Akash Fundkar : 32 हजार हेक्टर जमिनीला पाण्याचा पहिल्या टप्प्यात फायदा

Assembly Elections : विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. प्रत्येक पक्ष आता जाहीर सभा आणि विविध कार्यक्रमांवर भर देत आहे. यामध्ये रविवारी (ता.6) बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघात 2365 कोटी रुपयांच्या कामांचे शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस यांनी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर हे आधी वजनदार नंतर दमदार तर आता पाणीदार आमदार झाले, असे सांगून त्यांचे कौतुक केले.

 रविवारी खामगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या 2365 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. फडणवीस यांनी या प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आकाश फुंडकर यांचे कौतुक केले आहे. आपल्या भाषणातून फडणवीस म्हणाले, या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य हे की जेव्हा आकाश फुंडकर निवडून आले, त्यावेळी त्यांना लोक वजनदार आमदार म्हणायचे. त्यानंतर त्यांनी काम केलं आणि त्यांचं काम पाहून लोक त्यांना दमदार आमदार म्हणू लागले. आज पासून आकाश फुंडकर यांच नाव पाणीदार आमदार म्हणून या ठिकाणी होणार आहे, असे फडणवीस म्हणाले. 

वेगाने काम सुरू 

फडणवीस पुढे म्हणाले, आता या मतदार संघाचे चित्र फुंडकर यांच्या नेतृत्वामध्ये बदलत आहे. एकीकडे जिगाव मुळे मोठ्या प्रमाणात मतदार संघाची गावच्या गाव ही या ठिकाणी पाणीदार होणार आहेत. आपण जिगावला मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाईपलाईन द्वारे पाणी घेऊन जायचं. शेतकऱ्याला थेट बांधावर पाणी द्यायचं, अशा प्रकारचा निर्णय आपण केला आहे. आज 7000 कोटी रुपये आपण जिगाव प्रकल्पाकरीता या ठिकाणी दिले. त्याचं काम अतिशय वेगाने आपण पूर्णत्वाला नेत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून खामगाव मतदार संघामध्ये ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येणार आहे. त्यामुळे कोरडवाहूचा शिक्का पूर्णपणे पुसला जाईल. आमचा भाग पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे बागायती भाग म्हणून आपल्याला आता ओळखता येईल, असे फडणवीस म्हणाले.

Nitin Gadkari : महापालिकेचा पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला

काय म्हणाले फुंडकर

यावर प्रतिक्रिया देतांना आमदार आकाश फुंडकर यांनी म्हणाले की, निश्चित कोणतेही काम करताना आपण जीव लाऊन काम करतो. आपल्या वरिष्ठांनी जेव्हा कौतुकाची थाप दिली तेव्हा निश्चित खूप आनंद होतो. पण हा आनंद तेव्हाच होईल, ज्या दिवशी हे काम पूर्ण होईल. सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचेल. शेतकरी जेव्हा संरक्षित शेती आणि शेती करू लागतील तेव्हा आनंद नक्कीच द्विगुणित होईल. खामगाव मतदार संघातील 30 ते 32 गावांमधील 32 हजार हेक्टर जमिनीला जिगाव प्रकल्पातील पाण्याचा पहिल्या टप्प्यात फायदा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी गावे त्यामध्ये येतील, असे फुंडकर यांनी सांगितले.

पोटदुखी कायमची बंद करावी

मतदारसंघात शेकडो कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाली आहेत. यामुळे विरोधकांना पोटशुळ उठले आहे. त्यावर ते विनाकारण टिका करतात. त्यातून बऱ्याच वेळा त्यांचे अज्ञान देखील प्रदर्शीत होते. त्यांना आम्ही आमच्या पध्दतीने हाताळतोच. परंतु अशा विरोधकांना आपण एखाद टेरामायसिनचे इन्जेक्शन देऊन कायमची पोटदुखी बंद करावी, अशी मिश्कील मागणी आमदार आकाश फुंडकर यांनी फडणवीस यांच्याकडे आपल्या भाषणातून करीत विरोधकांवर टीकाही केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!