महाराष्ट्र

Lok Sabha Election मेंढे,पडोळे यांचे नशीब होणार ईव्हीएम बंद !

Bhandara Gondia Constituency : मतदानासाठी प्रशासन सज्ज, तगडा बंदोबस्त

Bhandara gondia constituency : संसदेत लोकप्रतिनिधी पाठवण्यासाठी भंडारा-गोंदिया मतदार संघाचे मतदार सज्ज झाले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनही सज्ज आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. तत्पूर्वी मतदार केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी केली होती. महायुतीचे सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे यांचे नशीब ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे. 

भंडाऱ्यात वाढलेले तापमान लक्षात घेता मतदारांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून कूलर-थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्व घडामोडी मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस देखील सज्ज आहेत. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. उष्णतेच्या तडाखा पाहता मतदार देखील सकाळीच मतदान करण्यास पसंती देणार असल्याचे चित्र आहे.

19 एप्रिलला भंडारा-गोंदिया मतदार संघात मतदानासाठी 2,133 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांवर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 18,27,188 मतदार मतदान करणार आहेत. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने आवाहन केले जात आहे. दरम्यान रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रीय पक्षांचे तीन, नोंदणीकृत राजकीय पक्षांचे चार आणि अपक्ष 11 आहेत.तरी खरी लढत महायुतीचे उमेदवार, भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे तर आघाडीचे उमेदवार काँग्रेस नेते डॉ.प्रशांत पडोळे यांच्यात आहे.

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात 10 उमेदवार

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात आहे. 66 – आमगाव विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 62 हजार 281 मतदार आहेत. येथे मतदानासाठी 311 मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या मतदारसंघातील मतदार 10 उमेदवारांचा फैसला करणार आहेत.

Lok Sabha Election : स्थानिक नेत्यांसह गावपुढारी व्यस्त

पोलिसांकडे 2133 मतदान केंद्राची सुरक्षा

लोकसभा निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यात एकूण 1288 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. यामध्ये 112 मतदान केंद्र संवेदनशिल आहेत. कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित ठेवून निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी-9, पोलिस अधिकारी- 97, पोलिस अंमलदार/कर्मचारी 1917, होमगार्ड – 1393, केंद्रीय पोलिस दलाच्या 15 कंपन्या बंदोबस्तात आहेत. तर भंडारा जिल्ह्यात 2,031 पोलिस कर्मचारी कायद्या सुव्यवस्थेची जबाबदारी संभाळत आहे.लोकशाहीचा आजचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!