Polling Slip : सध्या महाराष्ट्रात जिकडेतिकडे विधानसभा निवडणुकीचे वातावरण सुरू आहे. निवडणूक येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. राजकीय प्रचार थंड झाला आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या वेळी मतदार हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. निवडणुकीत मतदारांना स्वत:च्या मतदान केंद्राची माहिती होणे गरजेचे असते. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून केंद्रनिहाय बूथ लेव्हल अधिकार्यांमार्फत व्होटर स्लीप वाटप करण्यात आल्या.
सध्या राज्यात अनेक ठिकाणी मतदार स्लीप वाटपाचे काम सुरू आहे. प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदानाची स्लीप पोहचवली जात आहे. सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धावाधाव सुरू आहे. उमेदवार व राजकीय पक्षांकडून प्रचारावर भर देण्यात येत आहे. प्रशासनाकडून यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपाय करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणूनच मतदारांना घरपोच मतदान चिठ्यांचे (व्होटर स्लीप) वितरण होत आहे.
पक्षांकडूनही पुढाकार
राजकीय पक्षांकडूनही मतदान चिठ्ठ्यांचे वाटप केले जात आहे. त्यावर उमेदवाराचे नाव, चिन्ह, ईव्हीएमवरील क्रमांक आदीचा उल्लेख आहे. सर्वच स्लीपवर मतदाराचे नाव नमूद आहे. मतदार वास्तव्यास असलेल्या मतदारसंघाचे नाव आहे. मतदान केंद्राचा पत्ता आहे. मतदान केंद्रातील मतदार यादी भाग क्रमांक नमूद आहे. याशिवाय विविध माहिती नमूद आहे. 20 तारखेला मतदानाच्या दिवशी नागरिकांची मतदान केंद्र शोधण्यासाठीची धावपळ थांबणार आहे.
मतदारांना ऑनलाइन पद्धतीनेही आपले नाव शोधता येणार आहे. मतदार स्लिप डाउनलोड करता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ही सुविधा उपलब्ध आहे. तेथे नाव मतदार यादीत शोधा हा पर्याय निवडावा लागेल. आवश्यक माहिती भरावी नागणार आहे. त्यात नाव, पत्ता, वय, इतर तपशील असेल. माहिती टाकल्याणनंतर शोधा या बटणावर क्लिक करावे लागेल. स्क्रिनवर मतदाराचे नाव दिसेल. त्यानंतर मतदाराला स्लिप स्क्रिनवर दिसेल. येथे ती डाउनलोड करता येईल. थेट प्रिंटही करता येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं ही सुविधा electoralsearch.eci.gov.in या वेबसाइटवर दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदारांसाठी खास अॅपही सुरू केले आहे. त्यावरही सर्व तपशिल दिसणार आहे. मतदार ओळखपत्र क्रमांक, मतदार आयडी क्रमांकाद्वारेही यादीतील नाव शोधता येणार आहे. मतदार ओळखपत्र क्रमांक माहिती असणे गरजेचे राहणार आहे. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी निवडणूक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही मदत घेता येणार आहे, असं प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे.