महाराष्ट्र

vishalgad : मास्टरमाईंड शोधा!

Congress : विशाळगडावरील घटना : विजय वडेट्टीवार यांचे सरकारला आवाहन

Vijay Wadettiwar : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील घटनेमागचा मास्टरमाईंड शोधावा. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. कुठल्याही परिस्थितीत सूत्रधार जगापुढे आलाच पाहिजे, असे आवाहन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले आहे.

विशाळगड येथे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट हैदोस घातला. हे अत्यंत निंदनीय आहे. विशाळगड येथील गजापूर येथे घडविलेली समाजविघातक घटना शासन पुरस्कृत आहे. त्यामुळे या घटनेमागील खरा सूत्रधार सरकारने समोर आणला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रकरण घडले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी. जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावे. नुकसानग्रस्तांना सरकारने मदत करावी. आणि हल्लेखोरांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

घटनेच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.

‘कोल्हापूर जिल्ह्यात पुरोगामी विचारांचा खासदार निवडून आल्याने जातीयवादी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा दुर्देवी घटना घडविल्या जात आहेत. विशाळगड येथे आंदोलनाच्या नावाखाली तोडफोड करणारे शिवप्रेमी असूच शकत नाहीत. त्यामुळे हल्लेखोर कोण होते याचा सरकारने तपास केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. विशाळगड येथे तोडफोड होत असताना पोलीसांचे हात कोणी बांधले? याचा सरकारने खुलासा केला पाहिजे. रवी पडवळ खुलेआम व्हीडीओवरून धमकी देतो. पण त्याला सरकार का पकडत नाही असा सवाल देखील श्री. वडेट्टीवार यांनी केला आहे.

Government Scheme : ‘चकटफू’ योजना खऱ्या लाभार्थ्यांनाच मिळावी

सरकारला प्रश्न सोडवायचा नव्हता

अतिक्रमणाचा प्रश्न सरकारने सुसंवादातून सोडविला असता तर दुर्देवी घटना घडली नसती. परंतु सरकारला हा प्रश्न सोडवायचा नव्हता, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. त्याचबरोबर यासंदर्भातील चौकशीच्या मागणीचे पत्र वडेट्टीवार यांनी सरकारला दिले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!