Lok Sabha voting : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी 25 मे रोजी 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 58 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे. सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. या टप्प्यात एकूण 889 उमेदवार रिंगणात असून यापैकी सर्वाधिक 223 उमेदवार हे हरियाणातील आहेत. तर किमान 20 उमेदवार जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत.
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीत आपला सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मतदान केंद्रांवर लोकांची गर्दी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही मतदान केले. यासोबतच उपराष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, मुख्य निवडणूक आयुक्तांसह अनेक व्हीव्हीआयपी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मतदारांच्या रांगेत उभे राहून राष्ट्रपती भवन संकुलातील डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान केले.
दिल्लीकडे सर्वांचे लक्ष
सहाव्या टप्प्यात सर्वांचे लक्ष लागले आहे ते दिल्लीकडे. दिल्लीच्या सातही जागांवर काँग्रेस आप आघाडी आणि भाजप यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक हाती प्रचार केला. जामीन मिळाल्या नंतर भाजप विरोधात त्यांनी जोरदार आघाडी उघडली होती. त्यामुळे दिल्लीत किती मतदान होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या शिवाय उत्तर प्रदेशच्या 14, हरियाणा 10, पश्चिम बंगाल 8, बिहार 8, झारखंड 4, ओडिशा 6 जागांचा समावेश आहे.
इतर अनेक दिग्गजांनीही मतदान केले
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दिल्लीतील मतदान केंद्रावर मतदान केले. ते म्हणाले, ‘जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असल्याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणूनच प्रत्येक देशवासीयाने लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि भारताचा विकास करण्यासाठी आपले मत वापरावे असे मला वाटते.’ मताधिकार ही जबाबदारी आणि शक्ती दोन्ही आहे. भारत ही जगातील सर्वात जिवंत असताना, सक्रिय आणि प्रभावी लोकशाही आहे.
दिल्लीतील सातही जागांवर शनिवारी मतदान होत आहे. याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, माजी खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर आणि भाजपचे सातही उमेदवार बन्सुरी स्वराज, हर्ष मल्होत्रा, प्रवीण खंडेलवाल, रामवीर सिंग बिधुरी, योगेंद्र चंदोलिया, कमलजीत सेहरावत आणि मनोज तिवारी आणि भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेशी संबंधित अनेक नेत्यांनीही मतदान केले.
Atul Londhe : गुन्हेगार होतात फरार; कारण गृहमंत्री बेजबाबदार..
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी देशाचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही मतदान केले. रॉबर्ट वाड्रा मतदानानंतर म्हणाले की, ‘मला खूप आनंद आहे की माझी मुलगी कॉलेज सोडून 2-3 दिवसांसाठी आली आहे जेणेकरून तिला मतदान करता येईल. बदल व्हायला हवा, असे तरुणांचे मत असल्याचे ते म्हणाले. सर्वांनी मतदान करावे आणि इंडिया युतीला संधी द्यायला हवी.’ युतीत पंतप्रधानांचा चेहरा असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, देश निवडेल, युती करेल. असे ते म्हणाले.