महाराष्ट्र

Gondia : विनोद अग्रवाल म्हणतात, ‘मी भाजपचाच आमदार’ 

Vinod Agarwal : निवडणुकीसाठी ग्रीन कार्पेट

Gondia constituency : 6 सप्टेंबर ला द लोकहित ने सर्वात आधी प्रकाशित केलेल्या बातमी ला गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी दुजोरा दिला आहे. मी भाजपचाच असल्याचा खुलासा आमदार विनोद अग्रवाल यांनी केला आहे. गोंदिया विधानसभा मतदार संघातील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी सोमवार 7 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्यक्त केले. त्यामुळे गोंदियात अग्रवाल विरुद्ध विरुद्ध सामना पहायला मिळणार हे निश्चित आहे.

पुढे बोलताना आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, मी भाजपमध्ये प्रवेश करतोय, अशी संभ्रमाची परिस्थिती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. पण मी पत्रकारांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी कधीही स्वत: भाजप सोडलेले नाही. मी 1985 पासून भाजपचाच होतो आणि या पुढेही नेहमी भाजपचाच राहणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काही संधीसाधू लोकांनी भाजपमध्ये येऊन सत्तेचे सुख उपभोगले. भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्या काळात कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी आम्ही स्वत: संघटित होऊन त्यांना वाचवण्याचे काम केले. कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलो. सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही ती कठीण निवडणूक जिंकलो.’

ज्या संधीसाधूंनी पक्षात सामील होऊन सत्तेचे सुख उपभोगण्याची स्वप्ने पाहिली होती. ते पराभूत होऊन पक्षाला मागे ढकलत राहिले. शेवटी पक्ष सोडून इतर पक्षात गेले. मात्र भाजपपासून दूर राहूनही आम्ही कधीही दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. आपण कालही तेच होतो आणि आजही तेच आहोत. आज आम्ही पुन्हा आमच्या प्रियजनांमध्ये आहोत याचा आम्हाला आनंद आहे. आज आमचे कुटुंब एकत्र विजय दिवस साजरा करत आहे. माझे हे पाऊल माझ्या काही प्रियजनांना आवडणार नाही. परंतु मी तुम्हाला खात्री देतो की मी माझ्या तत्त्वांशी कधीही तडजोड करणार नाही. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचा माझा सिद्धांत आणि संकल्प आहे, असेही ते म्हणाले

Gondia  News  : अदृष्य शक्तीवर अखेर ‘चाबी’ फिरली..

फुकेंकडून पाठराखण!

यावेळी माजी मंत्री डॉ परिणय फुके म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत आमदार विनोद अग्रवाल आणि भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. मात्र विनोद भैय्या यांनी पक्षासोबत राहण्याचे वचन नेहमीच पाळले. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना इतर पक्षांकडून अनेक प्रलोभने आणि मंत्रिपदाचे आमिष देण्यात आले. मात्र त्यावेळीही त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सर्व प्रलोभने नाकारून राज्यातील भाजप सोबतच राहण्याचे समर्थन केले होते. त्यामुळे पक्षाने आज त्यांचे निलंबन मागे घेतलेले असल्याचे पत्र परिषदेत सांगितले. या पत्रकारपरिषदेत आमदार विनोद अग्रवाल यांच्या सोबत माजी मंत्री डॉ. परिणय फुके,आमदार विजय रहांगडाले,माजी आमदार संजय पुराम, उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!