महाराष्ट्र

Lok Sabha Election :एसटी बसवर महायुतीच्या जाहिराती कशा?       

Buldhana Constituency : गावकऱ्यांनी अडविली बस 

Buldhana news : लोकसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन करणारी जाहिरात एसटी बसवर दिसल्याने गावकऱ्यांनी बस अडवली. जिल्ह्यातील शेलसुर येथे रविवारी हा प्रकार घडला.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे 12 दिवस उरले आहेत. काल चिखली येथे प्रवेशद्वारावर शिवसेना पक्षाचे चिन्ह असलेली मशाल झळकत होती, त्या संदर्भातील तक्रारीनंतर निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मशाल हटवली होती. दरम्यान,रविवारी सायंकाळी चिखली आगाराची बस क्रमांक एमएच 40 ,एक्यू 6281 ही डोंगरशेवली वरून चिखलीकडे जात होती.तेव्हा शेलसूर मध्ये ग्रामस्थांनी अडवली. बसवर महायुतीला मतदान करण्याचे आवाहन करणारी जाहिरात होती, त्यामुळे अनेकांनी त्यावर सवाल उपस्थित केला.

एसटी महामंडळ गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. एसटीच्या ताफ्यातील बसेसची दुरावस्था, कर्मचाऱ्यांचं थकलेलं वेतन असे अनेक प्रश्न महामंडळापुढं आहेत. राज्य सरकारच्या मदतीनं एसटी महांमडळाच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिक बसेसचा देखील समावेश आहे. नव्या बसेस सध्या शहरातील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरल्या जात आहेत. मात्र, ग्रामीण भागात सोडण्यात येणाऱ्या बसेसची दुरावस्था आहे. अशात नेहमीच तोट्यात चालणारे एसटी महामंडळ आता जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान लोकसभेचे रणशिंग फुंकल्या गेल्या नंतर पहिल्यांदाच निवडणुकीच्या जाहिराती एसटी बसेसवर झळकतांना दिसून येत आहे.

Buldhana News : भाजपच्या मतदारसंघात विहिर वाटपातून 16 कोटींचा भ्रष्टाचार?

सरकारी मालमत्तेवर राजकीय पक्षाची जाहिरात कशी? असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला. यासंदर्भात चिखली आगाराच्या प्रमुखांना विचारणा केली असता राज्यातील 1000 बसेसवर जाहिराती लावण्याचे आदेश आल्याचे त्यांनी सांगितले. एका जाहिरात कंपनीला हे कंत्राट दिले असून त्यांनी या जाहिराती लावल्याचे ते म्हणाले. यानंतर काही वेळ थांबल्यावर बसला जाऊ देण्यात आले.आचारसंहितेचे पालन सर्व पातळ्यांवर व्हावे अशी अपेक्षा गावकरी करीत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!