महाराष्ट्र

NDA Government : प्रतापरावांच्या ऑफिसमध्ये पोहोचले शिंदे, म्हणाले ‘आयुष’मान भव

Buldhana News : प्रतापराव जाधव यांनी स्वीकारला पदभार

Ayush Bhawan : केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी 11 जून मंगळवारी नवी दिल्ली आयुष भवनात मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. या पदभार सोहळ्यात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराज शिंदे हे देखील उपस्थित होते. विजयराज शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांना शुभेच्छा दिल्या. यामुळे आता विजयराज शिंदे आणि प्रतापराव जाधव यांच्यात चांगलीच दिलजमाई झाल्याची चर्चा बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे. निवडणूक काळात शिंदेंनी आमदार संजय गायकवाड यांच्यामुळे विरोधाची घेतलेली भूमिका आणि प्रतापरावांकडून त्यांच्या निवासस्थानी पोहचून झालेला मांढरी नाट्य संपूर्ण जिल्हा वासियांनी पाहिलेला आहे.

खासदार प्रतापराव जाधव आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यात 2014 पासून काही आलबेल नव्हते. आमदार संजय गायवाड यांचे राजकीय प्रमोशन खासदार जाधव यांनीच केल्याने विजयराज शिंदे दुखावले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी जाधव यांनी विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. प्रचारात सहभागी होण्याची विनंती केली. विजयराज शिंदे यांनीही जाधव यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसले. दरम्यान प्रतापराव जाधव यांनी मंत्री पदाचा पदभार स्वीकारला. आयुष भवनात पदभार स्वीकारतेवेळी विजयराज शिंदे देखील उपस्थित होते. तुमच्या हातून देशाची, बुलढाण्याची सेवा घडो अशा शुभेच्छा यावेळी विजयराज शिंदे यांनी ना.जाधव यांना दिल्या.

दिलजमाई मुळे एका गटात अस्वस्थता 

केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव आणि विजयराज शिंदे यांची जवळीक काही नेत्यांसाठी अडचणीची ठरू शकते. अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बुलढाण्यात या विषयावर आता आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांवर निशाणा साधल्या जाणार आहे.

Andhra Pradesh : नायडू म्हणाले, साथ जनतेची, आता वेळ कर्ज फेडण्याची

निवडणुकीत काढला होता एकमेकांचा ‘बाप’

बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे विद्यामन आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांचातील वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर विकोपाला गेला होता. उमेदवारी अर्ज भरण्यावरुन दोघांनीही एकमेकांवर जहरी टीका करत इशाराही दिला आहे. दरम्यान, यात महायुतीतील दोन्ही माजी आणि विद्यमान आमदारांनी एकमेकांचा बापही काढला होता. यावेळी बोलताना माजी आमदार शिंदे यांनी आमदार गायकवाड यांचा बाप काढलाय, तर निवडणूक झाल्यानंतर कोणाचे किती बाप आहेत हे दाखवून देईल. असा थेट इशारा आमदार संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांना दिला होता.

शिंदेंचे बंड ठरले होते औट घटकेचे

लोकसभा निवडणुकीत नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर भाजप बंडखोर उमेदवार तथा भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांनी आपली तलवार म्यान केली होती ! भाजपच्या बहुचर्चित ‘अब की बार ,चार सौ पार’ या उद्दिष्टासाठी आपण माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. अर्ज माघार घ्यायच्या अंतिम दिवशी म्हणजेच ८ एप्रिलला आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी माघारीचा निर्णय जाहीर केला होता.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!