महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : भूखंडावर ताव मारा आणि तृप्त व्हा, लाडक्या मंत्र्यांसाठी योजना !

Sanjay Rathod : संजय राठोड, बिल्डरमंत्री योजनेचे पहिले लाभार्थी

Attack On The Government : महायुतीच्या मंत्र्यांनी सरकारी तिजोरीतील पैसे फस्त केले आहेत. त्यामुळे आता ‘भूखंडांवर ताव मारा आणि तृप्त व्हा’ अशी नवी योजनाच या सरकारने लाडक्या मंत्र्यांसाठी आणली आहे. या योजनेचे लाभार्थी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आहेत, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

जमिनी हडपल्या 

गोर बंजारा समाजासाठी नवी मुंबईतील बेलापूर येथे दीड एकर भूखंड मिळाला होता. हा पाचशे कोटींचा भूखंड स्वत:च्या खासगी ट्रस्टच्या माध्यमातून हडप करण्याचा पराक्रम संजय राठोड यांनी केला आहे. गोर बंजारा समाजाची त्यांनी फसवणूक केली आहे. तसेच सध्या मंत्रिमंडळात असणाऱ्या बिल्डर मंत्र्यांनीदेखील सातशे कोटींचा भूखंड जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशनच्या नावाखाली हडप केला आहे.

कुलाबा महसूल विभागातील हा मोक्याचा भूखंड खाणारा बिल्डर मंत्री सरकारचा लाडका आहे. कागदपत्रांची हेराफेरी करून भूखंड खाण्याचा उद्योग या हेराफेरी सरकारने सुरू केला असल्याचा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी मंगळवारी (ता. 10) केला. त्याचबरोबर नागपूर येथील हिट अँड रन प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Mahayuti : महायुतीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर!

कायदेशीर का नाही

मुंबईतील प्रचितगड या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवारांनी सरकारमधील भ्रष्टाचार, कागपत्रांची हेराफरी समोर आणली. ते म्हणाले, मंत्री राठोड यांना भूखंड देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकार कक्षेच्या बाहेर जावून मदत केली आहे. मंत्री राठोड यांच्या खासगी सचिवांच्या पत्रावर कारवाई करून हा भूखंड दिला आहे. यासाठी विहित पद्धतीचा अवलंब केलेला नाही. कोणतीही कायदेशीर प्रक्रीया राबविलेली नाही.

बेकायदेशीर पत्रावर निर्णय घेऊन हा भूखंड दिला आहे. गोर बंजारा समाजाचीही यामध्ये फसवणूक झाली आहे. भ्रष्टाचार उघडकीस आल्यावर मंत्री राठोड भूखंड परत करण्याची भाषा बोलत आहेत. परंतु आता वेळ निघून गेली आहे. त्यांचा इरादा समाजाच्या लक्षात आला आहे. राठोड यांनी मंत्री म्हणूनदेखील बेकायदेशीर काम केले आहे. 2200 कोटीचा बजेट असताना 8000 कोटींची टेंडर काढली आहेत.

सरकारमधील बिल्डर मंत्र्याने तर कहरच केला आहे. जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशन या खासगी शिक्षण संस्थेच्या नावाखाली 700 कोटींचा कुलाबा महसूल विभागातील भूखंड हडप केला आहे. याची सगळी प्रक्रीया पूर्ण झाली आहे. परंतु हा भ्रष्टाचार उघडकीस येईल, या भीतीमुळे अजून शासन निर्णय निर्गमित केला नाही. सरकारने अशी चलाखी जरी केली असली तरी हे प्रकरण उजेडात आलेच.

भाजपने डोळे उघडे करावे

नागपूर येथील हिट अँन्ड रन प्रकरणाची सरकारने चौकशी करून भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या मुलावर कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. पुण्यातील पोर्शे कार प्रकरणात अजितदादा गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. वरळी येथील अशाच प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. आता तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस आरोपींना पाठिशी घालत आहेत. नंबर प्लेट काढून, सीसीटीव्ही नष्ट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!