महाराष्ट्र

Lok Sabha Election : विजय वडेट्टीवार यांनी अकलेचे तारे तोडत घेतली पाकिस्तानधार्जिणी भूमिका

Chandrashekhar Bawankule : कसाबच्या वक्तव्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रतिहल्ला

Political War : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला. निवडणुकीत मते मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

एक्स वरुन प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहेत. महाराष्ट्रात मविआ सत्तेत असताना याकुबच्या कबरीचे सुशोभीकरण केले. आता यांना कसाबचा पुळका आला आहे. काँग्रेस आणि वडेट्टीवार यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला.

ती गोळी कसाबची नव्हती

हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती हा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला. याविषयी बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तारतम्य नसलेले हे विधान असल्याने त्याचा निषेध केला.

Lok Sabha Election : हेमंत करकरे कसाबच्या नव्हे संघाच्या गोळीने मेले

मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याचे उदात्तीकरण काँग्रेसचे नेते कशासाठी करीत आहेत. यातून काँग्रेसची मानसिकता ध्यानात येते. परंतु राज्यातील जनता याला भीक घालणार नाही. आमचे फक्त वडेट्टीवार यांना एवढेच सांगणे आहे, कसलेही आरोप करताना ताळतंत्र बाळगा असे बावनकुळे यांनी ठणकावून सांगितले

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!