महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : काँग्रेस काढणार सरकारच्या पापांचे पत्र

Congress : महायुतीमधील प्रत्येक नेता कमिशन घेत असल्याचा आरोप

Mhavikas Aghadi : राज्यातील महायुती सरकार पूर्णपणे भ्रष्ट आहे. महायुतीमधील प्रत्येक नेत्याने कमिशनखोरी सुरू केली आहे. कमिशन घेतल्याशिवाय महायुतीमधील कोणताही नेता कोणाचेही काम करीत नाही. महायुतीचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी काँग्रेस लवकरच ‘सरकारचे पापपत्र’ प्रकाशित करणार आहे. चांगल्या कामाचे ‘श्वेतपत्र’ प्रकाशित करण्यात येते. परंतु महायुती सरकार भ्रष्ट आहे. त्यामुळे आम्ही पापपत्र प्रकाशित करणार असल्याचे, काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे (Vidhan Sabha) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. 

नागपूर येथे शनिवारी (ता. 20) वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, सरकार मुंबई आणि महाराष्ट्रातील जागा अदानीला विकत आहे. अख्खा महाराष्ट्र महायुती सरकारने गुजरातला विकण्याचा सपाटा चालविला आहे. उद्योजकांचे खिसे भरले जात आहे. हा प्रकार काँग्रेस खपवून घेणार नाही. अशात महायुतीमधील प्रत्येक नेता, प्रत्येक मंत्री आपापले कमिशन घेऊन काम करीत आहे. सरकारमधील प्रत्येक विभागात कमिशनबाजी सुरू आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

कधी नव्हे इतके दर

कोणतेही सरकारी काम करायचे असेल तर सरकारला आणि मंत्र्यांना दक्षिणा द्यावी लागत आहे. महायुती सरकारच्या कमिशनचे दर गगनाला भिडले आहे. देशात यांची ज्या ज्या राज्यात सत्ता आहे, त्या त्या राज्यांपैकी सर्वाधिक जास्त कमिशन महाराष्ट्रात घेतले जात आहे. काँग्रेसने या सर्व भ्रष्टाचाराचा (Corruption) पर्दाफाश करण्याचा निश्चय केला आहे. भ्रष्ट सरकारला खाली खेचण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. त्यामुळे सरकारच्या विविध विभागातील भ्रष्टाचाराचे विस्तर विवरणपत्र काँग्रेसने तयार केल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar : नागपुरात विकासाच्या नावावर चमकोगिरी

सरकार ओबीसी (OBC) आणि मराठा समाजाला (Maratha) आपसात लढविण्याचे पाप करीत आहे. राज्यात दंगली घडविण्याचे पाप सरकारने केले आहे. तरुणांना आतापर्यंत बेरोजगार ठेवण्याचे पाप केले आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला (Gujrat) नेण्याचे पाप केले आहे. लोकांचे घरं, पक्ष फोडण्याचे पाप केले आहे. त्यामुळे हे सरकार पापी आहे. सरकारने केलेली पापं लोकांपुढे आली पाहिजे. त्यामुळेच या पापांचा गोषवारा काँग्रेस लोकांपुढे ठेवणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या या पापपत्राला आता भाजप कोणत्या व कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार याकडे, आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे हे पापपत्र जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील मतदार त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासारखे राहणार आहे. एकूण लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत यश मिळाल्यानंतर सध्या काँग्रेस ‘फ्रंटफूट’वर असल्याचे दिसत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!