महाराष्ट्र

Maharashtra Assembly : दिव्याखाली अंधार; वडेट्टीवारांनी केली पोलखोल 

Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांवर आरोप करीत, चौकशीची केली मागणी

RTO : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. 29 जून रोजी विरोधी पक्ष नेत्यांकडून सरकारचे लक्ष प्रशासनात सुरु असलेल्या भ्रष्टाचारावर वेधले गेले आहे. यात मुंबईच्या अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा भ्रष्टाचार विजय वडेट्टीवारांनी उघड केला आहे. या विभागाबाबत धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या वर्षी खोट्या वाहन चालक चाचण्यांच्या आधारे 76 हजार ड्रायव्हिंग लायसन्स जारी केल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. 

बनावट चाचणीच्या आधारे तब्बल 76 हजार परवाने देण्यात आले. यानंतर आता मुंबई आरटीओने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, हे खाते मुख्यमंत्र्यांच्या अधिनस्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालये भ्रष्टाचाराची माहेरघरं झाली आहेत. या आधी आरटीओचा घोटाळा काही नवीन नाही. पण आता अंधेरी येथील आरटीओचा 125 कोटींचा मोठा घोटाळा समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून वडेट्टीवार यांनी आरटीओ मधील भ्रष्टाचाराला वाचा फोडली.

यामुळेच घडतात अपघात

वडेट्टीवार म्हणाले की, अंधेरी आरटीओ ने गेल्या वर्षी अनधिकृत वाहनांचा वापर करून बनावट ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्या आहेत. त्या आधारे सुमारे 76 हजार ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले आहेत. अशी लायन्स जारी केल्यानेच पुणे येथे घडलेल्या पोर्शे कार अपघातासारखी प्रकरणे घडत आहेत.

Maharashtra Assembly : वडेट्टीवारांनी बचतगटाचा भ्रष्टाचार केला उघड

दोन दुचाकींवर 41 हजार 93 ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले गेले, इतर 35 हजार 261 ड्रायव्हिंग लायसन्स कारवर देण्यात आले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या महालेखापालांनी हा धक्कादायक खुलासा केल्याचे वडेट्टीवार म्हणाले. सारथी ऑनलाइन डेटावरून 1 लाख 40 हजार ड्रायव्हिंग लासन्सची तपासणी करताना हा घोटाळा आला आहे. यापैकी 75 टक्के 70 हजार 354 ड्रायव्हिंग लायसन्स हे 2023-24 मध्ये जारी करण्यात आले. यामध्ये चार चाकी वाहनांना परवाने देताना बाइकचे ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात आल्याचा निष्कर्ष लेखापरीक्षकांनी काढला आहे.

रस्त्यावर वाहने चालवणाऱ्या हजारो चालकांच्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. माणसं मेली तरी आरटीओला काही फरक पडत नाही. आम्हाला फक्त पैसा द्या. तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा नाही. आम्हाला फक्त पैसा महत्वाचा आहे. अशा पद्धतीने बेदरकारपणे या कार्यालयाचा कारभार सुरू असल्याची टीका करत वडेट्टीवार यांनी चौकशीची मागणी केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!