NAGPUR politics : राज्यात महायुतीच्या पराभवाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर फोडले जात आहे. त्यात आता अण्णा हजारे पुन्हा जागी झाले आहेत. जागे होताच अण्णा हजारे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. शिखर बँकेच्या घोटाळ्यावरून अण्णा हजारे यांनी अजित पवारांच्या विरोधात आवाज उठविला आहे. अण्णा हजारे यांना कोणीतरी अजितदादांच्या विरोधात उचकवून दिले असणार. असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी दिले आहे.
निशाणा साधत.. टिका
अण्णा हजारे जागी झाले, मला काल कळलं की अण्णा हजारे आहेत. आतापर्यंत त्यांनी आराम केला. अण्णा हजारे जागी झाले आणि ते शिखर बँकेच्या घोटाळ्यावरून अजितदादांच्या विरोधात बोलायला लागले. त्यांना कोणी सुपारी दिली माहिती नाही. शिखर बँकेच्या घोटाळ्यात आधीच ‘क्लीन चीट’ मिळाली आहे. कुणीतरी त्यांना उचकवून दिलं, म्हणून ते बोलत आहेत. अजितदादांचं नाव खराब करण्याकरिता _विरोधकांचे_ प्रयत्न सुरू आहेत. असे प्रशांत पवार म्हणाले.
सेवा करून जनतेमध्येच राहतो..
प्रशांत पवार पुढे म्हणाले की, जो व्यक्ती जनतेची सेवा करतो, जो व्यक्ती जनतेमध्ये राहतो, त्याला बदनाम कसं करायचं. याकरिता आता अण्णा हजारे यांना उभ करून, अजितदादांच्या विरोधात वेगवेगळ्या याचिका दाखल करायच्या, असे विरोधी पक्षांनी ठरविले आहे. पण मला एक नाही कळत की, अण्णा हजारे यांचा जो चेला होता केजरीवाल, त्या केजरीवाल बरोबर काँग्रेस आहे. संजय राऊत यांनी त्यांच अभिनंदन केलं, जे स्वतः घोटाळ्यात आहेत, शिवसेना (उबाठा) घोटाळ्यात आहे, काँग्रेस पण घोटाळ्यात आहे. घोटाळे आणि भ्रष्टाचार करून केजरीवाल जेलमध्ये आहेत. यांच्या विरोधात अण्णा हजारे यांनी आधी उतरायला पाहिजे, ते दिलं सोडून आणि अजित दादांच्या मागे लागले. अशी टीकाही प्रशांत पवार यांनी केली आहे.
मला असं वाटतं की अण्णांनी केजरीवाल आणि काँग्रेसच्या विरोधात उभे राहायला हवे. केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याकरिता अण्णांनी आंदोलन केले पाहिजे.