महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : .. तर अजित पवारांना पक्षात घेतलच कशाला ?

Congress News : पक्ष संपवणे ही भाजपची जुनी परंपरा.

Political War : लोकसभा निवडणूक पार पडली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात भाजप प्रणित महायुतीला अपेक्षित यश मिळालेले नाही. यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. राज्यात महायुतीच्या पराभवाला अजित पवार जबाबदार आहेत, अशी चर्चा होत आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

विजय वडेट्टीवार भाजपवर निशाणा साधत म्हणाले की, जर तुम्हाला माहित होते की, अजित पवार यांच्यामुळे पराभव होणार आहे, तर मग त्यांना पक्षात घेतलंच कशाला? त्यांच्याशी युती केलीच कशाला ? एखाद्या नेत्याला पक्षात घ्यायचं आणि त्याला संपवायचे, ही भाजपची परंपरा आहे. अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेशदेखील त्याचाच भाग आहे. इतर पक्षातील नेत्यांना सोबात घ्यायचं, त्यांच्या भरवश्यावर समोर जायचं आणि मग त्यांना संपवायचं, ही भाजपची जुनी पद्धत आहे. अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

भाजपची फसवणुक 

दहा वर्षे भाजपने जनतेची फसवणूक केली आहे. मोठमोठी भाषणे देऊन खोटारडेपणा त्यांनीच केला आहे. संविधान बदलविण्याची भाषा भाजपच्याच खासदारांनी केली होती. शेतकरी उध्वस्त झाला त्याला कोण जबाबदार आहे ? महागाई वाढली, उद्योगपतींचे कर्ज माफ केले हा अपप्रचार कसा होऊ शकतो ? या प्रश्नांची उत्तरं आधी भाजपने द्यावी. त्याला उत्तर देण्यासाठी आम्हीही यात्रा काढू. जिथे जिथे ते खोटं सांगतील तिथे आम्ही खरं सांगू. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

भाजपची तयारी..

लोकसभेत भाजापला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. त्यांनी ठरविले तसे यश ते प्राप्त करू शकले नाहीत. आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. आपापले पक्ष कामाला लावणं हा त्यांचा अधिकार आहे. सर्वांनी तशाच पद्धतीने आपापल्या पक्षात सूचना दिल्या आहेत. त्यामूळे हा त्यांचा प्रश्न आहे. असेही वडेट्टीवार म्हणाले.

सांगलीच्या जागेसंदर्भात आधीची मागणी योग्य होती. तिथे काँग्रेसची ताकत होती. मात्र आघाडीत काही गोष्टी घडत असतात. आता निवडणूक संपल्यानंतर आम्हाला आघाडीत वाद वाढवायचा नाही. असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Political : स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीची सक्ती रद्द करा – आ. किशोर जोरगेवार

महाविकास आघाडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मला त्या बैठकीचं निमंत्रण नाही. मला माहित नाही, ती बैठक कशासाठी आहे. मला त्या बैठकीचा अजेंडादेखील माहित नाही. असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

error: Content is protected !!