Gondia News : राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी बचत गटात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा शनिवारी (ता. 29) उघड केला. बचत गट हे भ्रष्टाचाराचे केंद्र बनत चालल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपाला गोंदिया दुजोरा मिळाला आहे. बचत गटावर पाच लाख रुपयांचे कर्ज वितरण न करता ते पैसे रिसोर्स पर्सन, अध्यक्ष व सचिवांनी गडप केले. हा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात असलेल्या ग्राम मुंडीपार येथे घडला. येथील रिश्ते स्वयं सहाय्यता महिला बचत गटात 11 सप्टेंबर 2020 ते 5 सप्टेंबर 2022 या कालावधीत हा प्रकार घडला.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
ज्योत्सना महेश जमदाड (वय 31, रा. मुंडीपार) यांनी सालेकसा पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यानुसान कम्युनिटी रिसोर्स पर्सन निशा राजेंद्र नंदेश्वर (वय 40), बचत गटाच्या अध्यक्ष किरण महेश वाघमारे (वय 34) व सचिव निर्मल किशोर राऊत (वय 37, तिघेही रा. मुंडीपार) यांनी हा गैरप्रकार केला.
11 सप्टेंबर 2020 रोजी मंजूर झालेल्या जुन्या ठरावातील कागदपत्रांच्या आधारे त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सालेकसा शाखा गाठली. कर्ज काढण्याच्या कागदपत्रावर अध्यक्ष किरण वाघमारे व सचिव निर्मल राऊत यांनी स्वाक्षरी केली. बँकेतून पाच लाख रुपयांचे कर्ज काढले.
पैसे गेले कुठे?
एवढ्यावरच आरोपी थांबले नाही. त्यांनी ज्योत्सना जमदाड यांच्या गटाची कोणतीही सभा न घेता कर्जाची रक्कम स्वतःकडे ठेवून घेतली. गटाला एक रुपयाही दिला नाही. गटाची फसवणूक केली. आरोपी कम्युनिटी रिसोर्स पर्सन निशा नंदेश्वर, गटाच्या अध्यक्ष किरण वाघमारे व सचिव किशोर यांनी गटाच्या नावावर पाच लाख रुपयांचे कर्ज काढून घेतले. त्यांनी ही रक्कम गटाला देणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही.
Ajit Pawar : खेळाडुंना नोकरी : निकषांतील मुद्द्यांत भर घालणार !
कर्ज काढल्याची बाब जमदाड यांना माहिती नव्हती. सप्टेंबर 2022 मध्ये म्हणजेच दोन वर्षानंतर ज्योत्सना जमदाड यांच्या गटाला या कर्जाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी आरोपींविरुद्ध संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक नागदिवे करीत आहेत.