महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : वाटल नव्हतं..मोदी पण खोटं बोलतात

Congress Criticizism : विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन भडकले

Assembly Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (12 नोव्हेंबर) चंद्रपूरच्या चिमूर येथे प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी मोदी यांनी देशातील शेतकऱ्याला आम्हाला सशक्त बनवायचे आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत आहोत. सत्ता द्या, महायुती सोयाबीन शेतकऱ्यांना सहा हजार हमीभाव देईल, असं वचन दिलं. मोदींच्या या भाषणाचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेतला.

2014 मध्ये नरेंद्र मोदींनी शेतमालाला दीडपट भाव देण्याचे आश्वासन दिले होते. लोकसभा निवडणुकीत ‘अबकी बार, महंगाई पे वार’ व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. ती ऐका. यासोबत देवेंद्र फडणवीस यांची पाशा पटेल यांच्या बरोबरची यात्रा आठवा. भाजपचे नेते व्हिडीओ क्लिपमध्ये विकासाचे आवाहन करीत होते. शेतकऱ्यांसाठी फायदा होईल असे बोलत होते. मात्र आज परिस्थिती उलट आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य मूल्य मिळत नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

महिलांची फसवणूक

नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये खोटं बोलून सत्ता मिळविली. सत्तेवर येताच देशातील मोजक्या उद्योगपतींचे हित जोपासत महागाई वाढविली. राज्यात देवेंद्र फडणवीस व त्यानंतरच्या घटनाबाह्य सरकारने शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार यांचा भ्रमनिरास केले. नागरिकांची लूट केली. लोकसभेत फटका बसला. त्यामुळं लाडकी बहिण योजना आणली गेली. पण आता याच योजनेवरून भाजपवाले महिला भगिनींना धमकावत आहेत.

Sunil Kedar : कडक भाषेत दिला जयस्वाल यांना इशारा

भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत दीड हजार रुपये घेऊन काँग्रेसच्या मेळाव्यात जाणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवा. त्यांचे फोटो काढा असं सांगितले. इतकेच नव्हे तर, त्यांची व्यवस्था करतो, अशी धमकी दिली. भाजप काय आपल्या खिशातून राज्यातील महिलांना निधी देत आहे का? अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. कापूस बाजारात येताच त्याची निर्यात केली जाते. सोयाबीन आयात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता सोयाबीनचे भाव सात हजारांपर्यंत पोहोचले आहेत. असं असले तरी शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नाही.

खोट्यांचं सरकार

महायुती सरकारने शेतकऱ्यांचे वाटोळं केलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीसारखे मुद्दे उचलून दिशाभूल केली जात आहे, अशी टीका वडेट्टीवारांनी केली. शेतकरी यावेळी सरकारला माफ करणार नाहीत, असे ते म्हणाले भाजपच्या नेत्यांनी कर्नाटक, तेलंगणातील योजना थांबल्याचा आरोप केला आहे. हे आरोप खरे नाहीत. एकनाथ शिंदे सरकारनं महाराष्ट्राचा सातबाराअदानींच्या नावावर करण्याचा निर्धार केला आहे, असं म्हणत वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्राला महायुती सरकारएवढाच धोका अदानींचा देखील आहे. इकडे सगळे खोटारड्यांचे सरदार आहेत. जे लोक पक्ष फोडतात, चिन्ह फोडतात, त्या लोकांकडून खोटं बोलल्याशिवाय काय अपेक्षित आहे? कर्नाटकला बदनाम करू नका. तिथे जाऊन बघीतलं तर कळेल, असे वडेट्टीवार म्हणाले. भाजप लोकांची दिशाभूल करीत आहे. ‘फेक नॅरेटिव्ह’ यांच्याच रक्तात आहे. भाजप नेत्यांनी कर्नाटकाचा आमंत्रण स्वीकारून तिकडं जावं. तोंड स्वच्छ करावं, असा टोला त्यांला लगावला.

शिंदेंच्या बॅगा बघा

उद्धव ठाकरे यांची वणी विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा झाली. या सभेसाठी उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने वणीत दाखल झालेत. ठाकरे हेलिकॉप्टरमधून उतरताच निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ स्वत: उद्धव ठाकरे यांनी रेकॉर्ड केला. यावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.

एकनाथ शिंदे यांना एका दिवसाच्या दौऱ्यावर जाण्यासाठी 10 बॅग कशासाठी लागतात? एक बॅग पकडायला दोघेजण लागतात. काय कापड असलेल्या बॅग पकडायला दोघेजण लागतात काय? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना मोदी-शाह यांच्या बॅगांची तपासणी करण्याचाही सल्ला दिला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!