महाराष्ट्र

Congress : लोकसभा निवडणूक जिंकण्याचा वडेट्टीवार यांचा दावा

Exit poll : त्रास देणाऱ्या सरकारचा पराभव होईल

Vijay Wadettiwar : सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आटोपले आहे. सर्वांचे लक्ष एक्झिट पोलकडे लागले होते. नरेंद्र मोदींनी 400 पारची घोषणा केली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांनी निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. चार जूननंतर भाजप सत्तेतून बाहेर गेलेला दिसेल. इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. 35 जागांच्या आसपास आम्ही महाराष्ट्रात असू. कर्नाटकातही आम्ही पुढेच असू ते म्हणाले.

जनतेला त्रास

मोदी सरकारने 10 वर्षात काय केले. विकासाची निवडणूक पंतप्रधान अगोदरच हरलेले आहे. जनतेला त्रास देऊन धर्माचे राजकरण केले. 10 लोक त्यांच्याकडून असतील. तर 8 लोक विरोधात बोलतात. निकालानंतर सर्व स्पष्ट होईल. शेवटच्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर सर्वांचे लक्ष एक्झिट पोलकडे लागले होते. परंतु ही आकडेवारी सहसा चुकीची असते वडेट्टीवार म्हणाले. ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे. मात्र सध्या शेती एकाची पेरणी दुसऱ्याची असे सुरू आहे. कोणी कितीही पक्ष फोडले, चिन्ह पळवले, तरी फोडणाऱ्याला चपराक दिसत आहेत.

Salary : गुरुजींना पहिल्यांदाच मिळाले महिना संपण्यापूर्वी वेतन

चंद्रपुरातून विजय नक्की

पूर्व विदर्भात चंद्रपूरची लढत प्रतिष्ठेची आहे. महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर आहेत. 2014 आणि 2019 प्रमाणेच काँग्रेस गड अभेद्य ठेवेल. विजय वडेट्टीवार यांनी हा अंदाज व्यक्त केला. गडचिरोलीची जागा एक लाख मतांच्या अंतराने जिंकणार असल्याचे ते म्हणाले. त्यांना किंमत देण्याची गरज नाही, असे त्यांनी नमूद केले. वडेट्टीवार महायुतीत सहभागी होणार हे निश्चित असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. त्याला उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, संजय शिरसाट हे मुंगेरीलाल चे स्वप्न पाहत आहेत. मला बदनाम केल्याने त्यांचा फायदा होईल. जनतेला सरकारची रणनीती माहिती झालेली आहे. त्यामुळे या सरकारला जनता हाकलणार आहे. विधानसभा निवडणूक आम्ही एकतर्फी जिंकणार आहोत, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!