महाराष्ट्र

Chandrapur Congress : पैसे वाटताना काँग्रेसचे विजय चिमड्यालवार स्थानबद्ध

Assembly Election : मतदारांना केले जात होते प्रभावित

Maharashtra Politics : कोविड महासाथीनं लोकांना मरण्यासाठी वाऱ्यावर सोडणाऱ्या काँग्रेसनं आता आपली पातळी सोडली आहे. चंद्रपुरातील महिलांना संकटात टाकणाऱ्या काँग्रेसनं आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न फसल्यानं आता गैरमार्गांचा अवलंब सुरू केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाच्या दिवशी पैसे आणि दारूचं वाटप करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक पथक, पोलिसांनी छापा घालत काँग्रेसचे विजय चिमड्यालवार यांना ताब्यात घेतलं आहे. निवडणूक विभागानं राज्यात सर्वत्र नाकाबंदी केली असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जिल्ह्यात आलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मूल शहरातील काँग्रेस भवन येथे दारू आणि पैशांचं वाटप सुरू होतं. यासंदर्भाती तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी छापा घातला. त्यावेळी काँग्रेस भवनातून मोठ्या प्रमाणावर महिला मतदार बाहेर पडल्या. याशिवाय दारूच्या बाटल्या घेऊनही अनेक लोक बाहेर पडले. त्यानंतर पोलिसांनी चिमड्यालवार यांना ताब्यात घेतलं. चिमड्यालवार हे माजी नगराध्यक्ष आहेत. कोसंबी येथे हल्ला प्रकरणामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूलमध्ये तणाव

गांधी चौक परिसरात दारू आणि पैशांचे वाटप सुरू झाल्यानंतर याची वाच्यता सगळीकडे झाली. चिमड्यालवार हे संतोष रावत यांच्यासोबत कोसंबी येथे गेले होते. महिलांशी असभ्य वर्तन केल्यामुळं त्यांना लोकांनी बदडून काढलं. संतोष रावत हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बँकेच्या नोकर भरतीमध्ये एससी, एसटी, ओबीसींचं आरक्षण गायब केलं होतं. राकेश गावतुरे आणि अभिलाषा गावतुरे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. आचारसंहिता काळात ही भरती करण्याचा प्रयत्न होता. भरती करण्याबाबत बँकेच्या संचालक मंडळानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला वचन दिलं होतं.

न्यायालयीन खटल्यात टीसीएसच्या माध्यमातून नोकर भरती करण्यात येईल असं नमूद होतं. परंतु संतोष रावत आणि त्यांच्या नियंत्रणातील संचालक मंडळानं आयटीआय कंपनीला नोकर भरतीचं काम दिलं. त्यामुळं आता नोकर भरतीसंदर्भात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल झाली आहे. संतोष रावत आणि त्यांच्या संचालकांनी कोर्टाचाही अपमान केल्याची ही याचिका आहे. या याचिकेनंतर सहकार आयुक्तांनी नोकर भरतीला स्थगिती दिली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात रावत यांचा आरक्षण विरोधी चेहरा उघड झाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिष्ठा वाचविण्यासाठी विजय चिमड्यालवार यांच्या माध्यमातून पैसे आणि दारू वाटप सुरू केल्याचा आरोप होता. हा प्रयत्न फसल्यानं रावत यांच्यासह काँग्रेस आरक्षण, महिलांची सुरक्षा, व्यसनाधीनता यातूनच निवडणूक जिंकण्यासाठी हपापल्याचा आरोप होत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!