महाराष्ट्र

Raj Thackeray : गोंदियातून सुरुवात; शेगावला शेवट!

Vidarbha Visit : असा असणार राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा

मनसे प्रमुख राज ठाकरे आपल्या विदर्भ दौऱ्याची सुरुवात गोंदियातून करणार आहेत. 23 अॉगस्टला ते मुंबईवरून थेट गोंदियात दाखल होतील. तर 29 अॉगस्टला शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे दर्शन आणि स्थानिक बैठका घेऊन ते दौऱ्याचा समारोप करतील. मराठवाड्याचा दौरा गाजविल्यानंतर राज यांच्या विदर्भ दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे यांनी आता विधानसभा निवडणूकीवर लक्ष केंद्रित केले आहे. मनसेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मनसेकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. अलीकडेच राज यांनी मराठवाडा दौरा केला. यानंतर आता मनसे अध्यक्ष विदर्भ दौरा करणार आहेत. मराठवाड्यानंतर राज ठाकरे 23 ऑगस्टपासून विदर्भाच्या दौरावर असणार आहेत. राज ठाकरेंच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यानंतर आता विदर्भात या दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता खऱ्या अर्थाने वेध लागले ते विधानसभा निवडणुकीचे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी पक्ष संघटना ताकदीने कामाला लागल्या आहेत. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मागे नाही. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज्यातील सर्वच मतदारसंघांवर मनसेकडून लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे हे स्वतः संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांचा नुकताच मराठवाडा दौरा पार पडला. हा दौरा चांगलाच गाजला. या दौऱ्यादरम्यान आमदार अमोल मिटकरींची गाडी फोडण्याची घटना असेल किंवा धाराशीवमध्ये मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या विरोधात केलेली घोषणाबाजी असेल. तसेच त्यानंतर बीड मध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेको आंदोलन झाले. त्यामुळे आता आगामी विदर्भ दौऱ्यात देखील काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Assembly Election : विदर्भात भाजप, काँग्रेसला शोधावे लागणार सहा चेहरे

असा असेल विदर्भ दौरा!

राज ठाकरे यांच्या विदर्भाच्या दौऱ्याची सुरुवात गोंदिया येथून 23 ऑगस्टला होणार आहे. 23 ऑगस्ट रोजी गोंदिया येथे आगमन आणि गोंदिया येथील मतदारसंघनिहाय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर 23 ऑगस्ट रोजी भंडारा येथे निरीक्षक व पदाधिकारी यांची बैठक राज ठाकरे घेणार आहेत.

24 ऑगस्टला राज ठाकरे गडचिरोली आणि चंद्रपूर येथे असतील. त्याठिकाणी ते निरीक्षक आणि पदाधिकारी यांच्या बैठकीला मार्गदर्शन करतील. तर 25 ऑगस्टला राखीव दौरा असेल. 26 ऑगस्टला यवतमाळ ते वर्धा असा दौरा राज ठाकरे करतील. 27 ऑगस्टला नागपूर येथे पत्रकार परिषद आणि पदाधिकारी, निरीक्षक यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 28 ऑगस्टला राज ठाकरे अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 29 ऑगस्ट रोजी राज ठाकरे शेगाव येथे संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतील. त्यानंतर ते दुपारी बैठक घेणार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!