महाराष्ट्र

Lok Sabha Election : नागपुरात वसंत ढोमणे ठरले पहिले गृहमतदार

Nagpur Constituency : नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघापासून सुरुवात

Vote From Home : भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील नागरिक तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. नागपूर जिल्ह्यात 14 एप्रिलपासून गृह मतदानाला नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून सुरुवात झाली.

नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातील डायमंड नगर येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक वसंत ढोमणे यांनी सर्वप्रथम आपला गृह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाईत, क्षेत्रीय अधिकारी राजूरकर, केंद्राध्यक्ष मंगला गंगारे, बीएलओ वंदना तृपकाने यावेळी उपस्थित होते.

प्रथमच सुविधा

85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगांना मतदानाचा लाभ मिळावा यासाठी निवडणूक आयोगाने आता ‘व्होट फ्रॉम होम’ सुविधा सुरू केली आहे. त्यातून 14 ते 17 एप्रिल या कालावधीत नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातील एकूण 2 हजार 360 मतदार गृहमतदानाचा हक्क बजावणार आहेत. नागपूरसाठी निवडणूक विभागातर्फे 160 टीम तयार करण्यात आल्या आहेत. यात 480 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी 105 टीम तयार करण्यात आल्या आहेत. यात 315 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कुठल्याही प्रकारे मतदाराच्या मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा निवडणूक विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या गृह मतदान करून घेण्याची येत आहे. दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भात मतदान होणार असून येथेही गृह मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!