महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Election : वंचित मध्ये उमेदवारीसाठी सेटलमेंट

Quit Party : या पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा !

Vanchit Aghadi News : वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फेसबुक लाईव्ह करत वंचित मधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ॲड.बाळासाहेब आंबेडकर यां ची काही वरीष्ठ पदाधिकारी दिशाभूल करतात. चुकीची माहिती पोहोचवतात. जे उमेदवार कधी निवडून येऊ शकले नाही, ज्यांचे काही वजन नाही अशा लोकांना पुढे केले जाते. जे कधी ग्रामपंचायतची निवडणूक जिंकले नाहीत अशांना समोर केले जाते. तसेच उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवर सेटलमेंट केले जाते असा आरोप केला.

दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिये दरम्यान वंचित बहुजन आघाडीमध्ये बरेच काही घडून गेले.वरिष्ठांकडून डावलले जाते. पक्ष संघटन वाढविण्याऐवजी खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप करत सतीश पवार यांनी 5 मे रोजी ‘वंचित’चे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान समाजाची दखलपात्र लोकसंख्या असताना देखील समाजबांधवांची हतबलता दिसून आली. या परिस्थितीने व्यथीत झाल्याने आपल्याला हे पाऊल उचलावे लागले असे पवार यांनी म्हटले आहे.

विविध आंदोलनांद्वारे वर्षभरात सुशिक्षित बेरोजगार युवकांसोबतच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावले. मात्र, प्रामाणिकपणे केलेल्या कामाची आणि निष्ठेची कुठलीही कदर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून झाली नाही. याची खंत असल्याने आपण राजीनामा देत असल्याचे सतीश पवार यांनी म्हटले आहे. नियुक्ती झाल्यापासून मी पक्षवाढीसाठी कायम प्रामाणिकपणे काम केले आहे.

तीनशे शाखा स्थापन

‘गाव तिथे शाखा’ या अभियानांतर्गत जिल्हाभरात तीनशेवर शाखा स्थापन करून तेथील कार्यकारिणी सक्रिय केली. पक्षाला सत्तेकडे घेऊन जाण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. आंबेडकर कुटुंबीयांप्रति माझी निष्ठा प्रामाणिक असल्याने सातत्याने पूर्ण समर्पित होऊन काम करीत आलो.

धैर्यवर्धन पुंडकर यांच्यावर आरोप

लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याची संधीही दिली नाही. उमेदवाराकडून प्रचार साहित्य व स्टेशनरी मागूनही मिळाले नाही. उमेदवारांनी स्पष्टपणे सांगितले की, युवा आघाडीला कोणत्याही प्रकारची जबाबदारी न देण्यासंदर्भात प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर यांचे स्पष्ट आदेश आहेत. उमेदवारांनी कायम आम्हाला प्रचार करण्यापासून थांबवले, असेही पवार यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

Split in Congress : मागाठाणे विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला गळती

फेसबुक लाईव्ह मधून मनातील खदखद

फेसबुक लाईव्ह करीत सतीश पवार यांनी खदखद व्यक्त केली. मला पक्षात काही लोकांनी जाणूनबुजून डावलले. काही लोकांचा समज होता की बांधावरची लोक यांना आम्ही खांद्यावर कसे घेणार ? बौद्ध समाजाला हतबल, उपेक्षित ठेवण्याचं काम उमेदवाराने केल्याचे मी स्वतः बघितलं. यापुढे समाजासाठी काम करण्याची संधी मला मिळेल. यापुढे समाजासाठी मोर्चे व आंदोलन करण्यासाठी मी तयार राहील. समाजाच्या हितासाठी कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा आमच्यावर दबाव असणार नाही. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी काल राजीनामा केला आहे.

10 मे रोजी आम्ही आमची पुढील भूमिका ठरवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे असे सतीश पवार म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!