महाराष्ट्र

Haryana Elections : वंचितने सांगितलं काँग्रेसच्या पराभवाचं कारण!

Vanchit Bahujan Aghadi : हा समूदाय नाराज झाल्याने बसला फटका; वंचितचा दावा

हरियाणासह जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजप पिछाडीवर पडला होता. मात्र, नंतरच्या भाजपने मोठी मुसंडी मारत हरियाणात तिसऱ्यांदा सत्तास्थापन करण्यांत यश मिळवलं. हरियाणात सत्तास्थापनेसाठी 46 चा जादुई आकडा आवश्यक होता. भाजपने तो आकडा पार करत ४८ जागांवर विजय मिळवला. यावर वंचित बहुजन आघाडीकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. वंचितने काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.

हरियाणामध्ये भाजपने सर्वांचा धुव्वा उडवत धडाकेबाज विजय मिळवला. पण जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला सरकार स्थापन करता आलेलं नाही. तेथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळालं आहे. या संपूर्ण निकालानंतर भाजपकडून सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात भाजपचं मनोबल वाढलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसवर टीका केली जात आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस वर जोरदार निशाणा साधला आहे. वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी काँग्रेसच्या पराभवाचे कारण सांगीतले आहे. दलित मुलीचा अपमान केल्यानेच हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Nana Patole : अकोल्यातील तणावासाठी भाजप दोषी

काँग्रेसने दलित मुलीचा अपमान केला!

हरियाणात काँग्रेसच्या पराभवाचे खरे कारण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? असा सवाल विचारत मुख्य प्रवक्ते मोकळे यांनी म्हटलं की, दलित मुलीचा अपमान हे मुख्य कारण आहे. कुमारी शैलजा यांचा अपमान केला. यामुळेच काँग्रेसचा पराभव झाला. हरियाणातील दलितांनी जातीयवादी काँग्रेसने त्यांचा कसा अपमान केला हे पाहिले. त्यांच्या पक्षातील कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही. काँग्रेसने त्यांना निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवल्याचेही मोकळे म्हणाले. हरियाणातील दलितांनी आपल्याच मुलीचा झालेला अपमान पाहिला. ते त्यांना सहन झालं नाही. दलितांनी सूड घेतला आणि काँग्रेसचा पराभव केला, असा दावाही त्यांनी केला आहे.

अंदाज खोटा ठरला

एकीकडे विविध एक्झिट पोल्सनी देखील हरियाणामधील हरियाणात काँग्रेसच विजयी होणार असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेसच्या नेत्यांनाही विश्वास होता. हरियाणामधील जनता काँग्रेस पक्षाला कौल देणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, तो अंदाज सपशेल फोल ठरला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!