महाराष्ट्र

Siddhart Mokle : खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका

Vanchit Bahujan Aghadi : सिद्धार्थ मोकळे यांचं संजय राऊतांना आव्हान

Assembly Election : ‘माझं संजय राऊत यांना आव्हान आहे की, ओबीसीचे राजकीय आरक्षण तुम्ही संपवले की नाही ते सांगा? क्रिमिलेयरचा निर्णय लागू झाल्यावर एससी, एसटी यातून बाद होणार की नाही ते सांगा? बाळासाहेब जे सांगत आहेत त्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करू नका. जनतेला तुमचे खरे चेहरे आता दिसू लागले आहेत.’ वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी हे आव्हान दिलं आहे. मोकळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं.

मोकळे यांनी म्हटले आहे की, बाळासाहेबांनी रुग्णालयातून आयसीयूमध्ये असताना जनतेसाठी एक व्हिडीओ प्रसारित केला. ज्यामध्ये त्यांनी मतदारांना आणि जनतेला आवाहन केले. ओबीसी, एससी, एसटी यांचे आरक्षण वाचवायचे असेल, तर यंदाच्या निवडणुकीत योग्य भूमिका घ्या. वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहा. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेबांचे हे विधान सत्यावर आधारित नाही. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. महाराष्ट्र आम्ही सांभाळू.

‘वंचित’चा संताप

संजय राऊत यांच्या या विधानानंतर ‘वंचित’नं संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सांभाळण्याच्या गप्पा मारणाऱ्या संजय राऊत यांना सांगायचं आहे की, बाळासाहेबांची विधाने तथ्यावर, सत्यावर आधारित आहेत. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षानंतरच्या सत्तेनंतर महायुती सत्तेत आली. या दोघांच्या कार्यकाळात ओबीसीचे राजकीय आरक्षण यांनी वाचवले नाही. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले आहे. तुमच्या हातात असताना सुद्धा, तुम्हाला शक्य असताना सुद्धा न्यायालयासमोर योग्य डेटा आणि आकडेवारी दिली नाही. ही माहिती न्यायालयाला देणे गरजेचे होते. ती तुम्ही दिलेली नाही. यावरून तुमची आरक्षणाच्या बाबतीतील नियत उघड झाली, असल्याचेही मोकळे म्हणले.

सर्वोच्च न्यायालयाने एससी, एसटी आरक्षणात क्रिमिलेयर लागू करण्याचा निर्णय दिला. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचे वाजतगाजत स्वागत केले. हा निर्णय लागू करणारे पहिले राज्य आमचे असेल, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांनी यासंदर्भात समिती सुद्धा जाहीर केली. उत्तरेत भाजपने तो निर्णय लागू करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातसुद्धा शेवटच्या दिवशी आचारसंहिता लागण्यापूर्वी एकना ा शिंदे सरकारने या निर्णयासंदर्भात समिती गठीत केली आहे. महाविकास आघाडीतून संजय राऊत यांच्यासकट कोणीही याला विरोध केला नाही, असं मोकळे यांनी निदर्शनास आणून दिलं.

मोकळेंचं स्पष्टीकरण

क्रिमिलेयर लागू झाले, तर एकदा आरक्षणाचा लाभ घेतलेल्या कुटुंबाला आरक्षणातून वगळण्यात येणार आहे. याचाच अर्थ त्या कुटुंबासाठी आरक्षण संपणार आहे. ही वस्तुस्थिती बाळासाहेब आयसीयूमध्ये असतानासुद्धा मांडत आहेत. त्यामुळे ही बाबत राऊतांना झोंबणे स्वाभाविक आहे. याचे खंडन त्यांना करता येत नाही. त्यामुळं बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न ते करत असल्याची टीका मोकळे यांनी केली.

संजय राऊत यांना आवाहन करत मोकळे म्हणाले की, ओबीसीचं राजकीय आरक्षण तुम्ही संपविले की, नाही ते सांगा? क्रिमिलेयरचा निर्णय लागू झाल्यावर एससी, एसटी यातून बाद होणार की, नाही ते सांगा ? बाळासाहेब जे सांगत आहेत त्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करू नका. जनतेला तुमचे खरे चेहरे आता दिसू लागले आहेत. त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होणार आहे. याची भीती तुम्हाला आहे. त्यामुळे बाळासाहेबांवर तुम्ही उलटसुलट आरोप करीत आहात. हे आरोप का होत आहेत हे आम्हाला माहिती आहे. पण जनता आता दुधखुळी राहिलेली नाही. आरक्षणाच्या संदर्भातील तुमच्या भूमिका आम्ही उघड करणार आहोत आणि जनतेला सत्य सांगत राहणार आहोत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!