Assembly Election : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण करण्याचे जाहीर केले आहे. मनोज जारंगे पाटील हे दाऊद इब्राहिमशी संबंध ठेवणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांना पडणार का? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीने विचारला आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. वंचित बहुजन आघाडीने मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर संशय ही व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उमेदवार न देता पाडापाडी करणार असल्याची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीचा त्यांना सवाल आहे की, ते दाऊदशी संबंधित असलेल्या पक्षाचे उमेदवार पाडणार आहेत की त्यांना जिंकवणार.
मनोज जरांगे यांनी उमेदवार जाहीर करणार नसल्याचे सांगितले होते. पण पाडापाडी करणार, असेही त्यांनी जाहीर केले होते. मतदानाला गुपचुप जायचं आणि गुपचूप पाडायचं असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले होते. जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित झाल्या आहेत. पण कोणत्या पक्षाचे उमेदवार ते पाडणार हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी ट्विट करत त्यांना दाऊदशी संबंधित पक्षाचे उमेदवार पाडणार की त्यांना जिंकणार ? असा सवाल केला आहे.
पवारांचा उल्लेख नाही
रेखा ठाकूर यांनी केलेल्या पोस्टमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा उल्लेख नाही. मात्र दाऊदशी संबंधित प्रश्न विचारण्यात आल्याने त्यांचा रोख शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे मुख्यमंत्री असताना दुबई विमानतळावर दाऊदला भेटल्याचा दावा केला होता. त्यांच्या प्रवासाचा संपूर्ण तपशील आंबेडकर यांनी माध्यमासमोर मांडला होता. शरद पवार यांनी या विषयावर स्पष्टीकरण द्यावं असं जाहीर आव्हान त्यांनी दिलं होतं. मात्र या संदर्भात पुढे काहीच झालं नाही.
Vanchit Bahujan Aghadi : झिशानच्या दगाबाजीनंतर पाठिंब्याबाबत जवळपास ठरलं
विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते. मात्र अचानक त्यांनी आपली भूमिका बदलली. उमेदवार देणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. त्याऐवजी उमेदवारांना पाडण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना मनोज जरांगे हे मराठा समाजाला पराभूत करायला लावणार, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच रेखा ठाकूर यांनी गेलेल्या ट्विटमुळे मनोज जरांगे यांना शरद पवारांवरून प्रश्न विचारण्यात आला आहे. शरद पवार यांनीच मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाचा आंदोलन हो केलं, असा आरोप सातत्याने होत आहे.