महाराष्ट्र

shivaji Maharaj Statue : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पण गृहमंत्री..

Vanchit Bahujan Aghadi : प्रकाश आंबेडकर यांची फडणवीस यांच्यावर टीका

Malvan Rajkot Case : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर राजकीय नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे. सत्ताधारी भाजपनेही आंदोलन केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. पण गृहमंत्र्यांनी अद्याप माफी मागितली नाही, अशी टीका आंबेडकर यांनी केली. पुतळा पडला की पाडला, याची चौकशी व्हावी. मातीचे प्लास्टिकचे पुतळे ताशी 45 किलोमीटरची हवा आली तरी हे पडले नाहीत, असेही ते म्हणाले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. शिवप्रेमींकडून या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आक्रमक झाली आहे. विविध प्रकारचे आंदोलन करून निषेध नोंदविण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपही (BJP) आंदोलन करताना दिसत आहे. यावरूनच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर पंतप्रधानांनी माफी मागितली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही, असा आरोप आंबेडकरांनी केला.

दर्जावर प्रश्नचिन्ह

माती, प्लास्टिक आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे अनेक पुतळ्यांचे उद्घाटन आपण केलं. पण ते कधी पडले नाही. ताशी 45 किलोमीटर हवा आली, तरी हे पुतळे पडले नाही. अशात धातुचा पुतळा कसा पडला? किंबहुना पुतळा पडला की पाडला? असा सवालही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. नांदेड (Nanded) येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर यांच्या विधानावरून भाजपकडून कोणती प्रतिक्रिया येते, ते पाहावे लागणार आहे.

Nitin Gadkari : कुणाला पाय, कुणाला ई-रिक्षा!

आंबेडकर यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी आंदोलन करीत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. सत्ताधारी स्वतःच्या विरोधातच आंदोलन करीत आहेत का, की केवळ विरोधात आहोत, हे दाखविण्यासाठी आंदोलन करीत आहेत, असे आंबेडकर म्हणाले

सांगलीमध्ये (Sangli) देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एका व्यासपीठावर होते. याकडे देखील आंबेडकर यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. महिलांच्या अत्याचाराबाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पार्टी जवाबदार असल्याचेही आंबेडकर म्हणाले.

चौकशीची मागणी!

पूर्वीच्या काळात देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले किंवा इतर महापुरुषांचे पुतळे असायचे. ते गावागावत बसविले गेले आहेत. नुसते चबुतर्‍यांवर हे पुतळे बसविले गेले. मात्र ते कधी पडल्याची घटना घडली नाही. पुतळे विद्रूप करण्याच्या, विटंबना करण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र पुतळा पडल्याच्या घटना बघण्यात किंवा ऐकण्यात नाहीत. त्यामुळे असा संशय येतो की, मालवणमधील पुतळा पडला की पाडला? राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती विचित्र झाली आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम होऊ शकते. अशा संशयाला वाव आहे. त्यामुळे मालवणमधील पुतळा पडला की पाडला याची चौकशी व्हायला हवी, असेही आंबेडकर म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!