महाराष्ट्र

Prakash Ambedkar : आयाराम-गयाराम करू नका..

Assembly Election : प्रकाश आंबेडकर यांचे मोठे वक्तत्व

VBA : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 4 हजारांहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे कृषी नगरातील पोदार शाळेतील मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले.आपण ज्या विचारसरणीला मानता, त्या विचारसरणीला मोठ्या प्रमाणात मतदान करावे. आयाराम-गयाराम आणि खरेदी पोरोष करण्यापेक्षा एका विचाराचे सरकार चालेल, यासाठी मतदान करावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना केले आहे.

असे म्हणाले बाळ आंबेडकर..

आम्ही सत्तेत सहभागी होणार आहोत. पण कोणत्या विचारधारेला सर्वाधिक मते मिळतात, त्यावर ते अवलंबून आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. वंचितचे कार्यकर्ते आणि उमेदवारांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला. तसेच आयाराम-गयाराम आणि खरेदी पोरोष होण्यापेक्षा एका विचाराचे सरकार चालेल, यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहनही प्रकाश आंबेडकरांनी केले.

राज्यातील सध्याचे राजकारण तत्वहीन आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणीही कुठेही जाऊ शकतं. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सत्तेसोबत जाणं महत्त्वाचं वाटतं. या वक्तव्यातून प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

23 तारखेला निर्णय..

यंदाच्या निवडणुकीनंतर दोन राष्ट्रीय पक्ष बाजूला झालेले असतील, एवढे दिसून येत आहे. प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य वाढलेले असेल, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. आम्ही जेवढ्या लढलो तेवढ्या निवडून याव्यात अशी आमची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. तिसरी आघाडी निर्णयक असणार का? या प्रश्नाला उत्तर देताना, त्याबाबत 23 तारखेला समजेलच असे आंबेडकर म्हणाले.

Amravati District : मेळघाटातील मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार

राज्याचे माजी गृहंमत्री आणि राष्ट्रवाद काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. काटोल मतदारसंघासोबत नागपूर व राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटल्या आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मतदानाच्या काही दिवसाआधी असा हल्ला होणे याबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचे कार्यकर्ते आणि उमेदवारांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाल्याचा आरोप केला आहे. कळमनुरी आणि देवळाली मतदारसंघातील उमेदवारांवर हल्ला झाला आहे. तर वरुड मोर्शी येथील 84 वर्षांच्या उमेदवाराला चार दिवसांपूर्वी पळवून घेऊन गेले आहेत. आम्ही पोलिसांत तक्रार देऊन तीन दिवस झाले आहेत. तो उमेदवार अद्यापही सापडत नाहीये. लोहा-कंधारमध्येही असाच प्रकार घडला आहे. लक्ष्मण हाके यांच्यावरही हल्ला झाला आहे. नवनाथ वाघमारे यांच्यावरही हल्ला झाला. यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यात सत्ता परिवर्तन होत असल्याच्या भितीतून हा सर्व प्रकार होत असावा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!