Rituja Chavan : वंचित बहुजन आघाडीने राज्यातील विधानसभेसाठी १६ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. यापूर्वी पहिली यादी ११ उमेदवारांची होती. दुसरी यादी १० तर तिसरी यादी ३० उमेदवारांची होती. चौथी व पाचवी यादी १६ उमेदवारांची आहे. राज्यात सर्वात प्रथम उमेदवार घोषित करण्याचा निर्णय वंचितने घेतला. पाचव्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मंगलदास तुकाराम निकाळजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मेहकरमध्ये डॉ. ऋतुजा चव्हाण यांना संधी दिली आहे. त्यामुळे मेहकरमध्ये दोन डॉक्टर आमनेसामने उभे ठाकले आहेत.
धक्का राजकीय पक्षांना
१६ उमेदवारांची पाचवी यादी वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी (ता.२१) जाहीर करत राजकीय सर्व राजकीय पक्षांना धक्का दिला आहे. कारण या यादीमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे. डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे मेहकरात प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का बसणार असल्याचे दिसून येते. डॉ. ऋतुजा चव्हाण यांची शेतकरी नेत्या म्हणून ओळख आहे. त्यांचे पती ऋषांक चव्हाण यांनी शेतकरी चळवळीत मोठे योगदान दिलेले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर, डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह त्यांनी पीकविमाप्रश्नी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.
सामाजिक कार्यासाठी सुपरिचित असलेल्या डॉ. ऋतुजा चव्हाण यांना अखेर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली. मेहकर विधानसभा मतदारसंघात त्या निवडणूक लढवत आहेत. आज, प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे मेहकर विधानसभा मतदारसंघात आमदार डॉ.संजय रायमुलकर विरुद्ध डॉ. ऋतुजा चव्हाण या दोन डॉक्टरांचा सामना रंगणार हे निश्चित झाले आहे.
डॉ. ऋतुजा चव्हाण शेतकरी चळवळीत कार्यरत आहेत. त्यांचे पती ऋषांक चव्हाण हे देखील सहकार व शेतकरी सर्व येथील लोकप्रिय नेतृत्व म्हणून समोर आले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी सर्वस्वी प्रयत्न करेन,’ असे त्या म्हणाल्या आहेत.
पाचव्या यादीतील उमेदवार –
जगन देवराम सोनवणे – भुसावळ
डॉ. ऋतुजा चव्हाण – मेहकर
सुगत वाघमारे – मूर्तीजापूर
प्रशांत सुधीर गोळे – रिसोड
लोभसिंग राठोड – ओवळा माजिवडा
विक्रांत चिकणे – ऐरोली
परमेश्वर रणशुर – जोगेश्वरी पूर्व
राजेंद्र ससाणे – दिंडोशी
अजय रोकडे – मालाड
ॲड. संजीवकुमार कलकोरी – अंधेरी पूर्व
सागर गवई – घाटकोपर पश्चिम
सुनीता गायकवाड – घाटकोपर पूर्व
आनंद जाधव – चेंबूर
मंगलदास निकाळजे – बारामती
अण्णासाहेब शेलार – श्रीगोंदा
डॉ. शिवाजीराव देवनाळे – उदगीर