महाराष्ट्र

Lok Sabha Election : यवतमाळात भावना गवळी यांची गच्छंती, राजश्री पाटील यांना उमेदवारी

Bhavana Gawali : भावना गवळी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष

Yavatmal Constituency : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी मध्ये फेरबदल झाला. तिढा अद्यापही कायम आहे. विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तिकडे हिंगोली मतदारसंघातही उमेदवार बदलला आहे.

मेरी झान्सी नही दूंगी’ म्हणत यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघावर विद्यमान खासदार भावना गवळी यांनी दावा केला होता. परंतु बदलत्या घडामोडी मुळे त्यांचा जीव टांगणीला लागला होता. कारण पूर्वीपासून या मतदारसंघावर भाजप कडून दावा केला जात होता. तर दुसरीकडे भावना गवळी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच होती. अनेकांचे नाव या मतदारसंघासाठी इच्छुकांमध्ये होते. शिवसेनेच्या शिंदे गटांकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीत यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या उमेदवाराचा समावेश नव्हता. त्यामुळे या मतदारसंघाचा तिढा कायम होता. आजही या मतदारसंघाचा तिढा कायम आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघाच्या उमेदवार ठरवण्यासाठी महायुतीत मोठ्या प्रमाणात खलबते सुरू होती. शेवटी राजश्री पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

राजश्री पाटील यांचे नाव आघाडीवर!

राजश्री पाटील या खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून देण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता त्यांना उमेदवारी दिली आहे. उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करताना उपस्थित राहणार आहेत.

Lok Sabha Election : रामटेक मतदारसंघात रश्मी बर्वे यांचा काँग्रेसकडूनच गेम

उमेदवारी साठी फिल्डिंग

विद्यमान खासदार भावना गवळी या गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करीत होत्या. तर मध्यंतरी हेमंत पाटील आणि हेमंत गोडसे यांच्यासह वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. दोन दिवसांपूर्वी भावना गवळी नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या होत्या. त्यानंतर आज सकाळपासून भावना गवळी वर्षा बंगल्यावर ठाण मांडून बसल्या होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी यांच्याऐवजी राजश्री पाटील यांना उमेदवारी देऊ केल्याची चर्चा होती आणि बुधवारी रात्री त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता भावना गवळी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कोणावरही अन्याय होणार नाही

शिवसेना पदाधिकारी म्हस्के यांची प्रतिक्रिया माध्यमाच्या प्रतिनिधींनी जाणून घेतली. तेव्हा पक्षाकडून कोणावरही अन्याय होणार नाही. याबाबत पक्षश्रेष्ठींची भूमिका स्पष्ट आहे असे त्यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!