Bhandara Gondia Constituency : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये विविध मार्गांवर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन सतर्क झाले. सीमेवर तसेच इतर प्रमुख मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची झडती सुरू झाली. परंतु आता एका वाहनात आढळलेल्या 1 कोटी 76 लाख रुपयांचा गुंता समोर आला आहे.
27 मार्चला गोंदिया जिल्हाच्या गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत पोलिस अधिकारी अभिषेक मानकर यांच्या नेतृत्वात पथकाने स्विफ्ट कारमधून 1 कोटी 76 लाख रुपयांची रोकड जप्त केली. वाहन थांबविल्यानंतर शहरातील संस्था आणि खासगी बँकांच्या एटीएममध्ये ही रोकड पुन्हा भरण्यासाठी नेत असल्याचा दावा ऑपरेटरने केला होता. मात्र,आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले. बँकांनी जप्त केलेल्या रोख रकमेची मालकी नाकारली. कॅश व्हॅन ऑपरेटरची भूमिका संशयास्पद पाहिली जात असून 1.76 कोटी रुपयांचा मालक कोण? याचा शोध आता घेतला जात आहे.
Lok Sabha Election : यवतमाळच्या कारागृहातून सर्वच्या सर्व मतपत्रिका परत कारण..
पोलिसांनी जप्त केलेल्या रकमेबाबत कार्यवाही सुनिश्चित करण्यासाठी हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपविले. आयकर विभागाने कॅश व्हॅनमध्ये जप्त केलेल्या रकमेबाबत बँकांकडे चौकशी केली. क्रॉस व्हेरिफिकेशन दरम्यान बँकांनी जप्त केलेल्या वाहनातील रोख रक्कम पाठविण्यास नकार दिला. या प्रकरणात ऑपरेटर अनिवार्य क्यूआर कोड सबमिट करू शकला नाही. जो लोकसभा निवडणुकीसाठी लॉन्च केलेल्या इलेक्शन जप्ती व्यवस्थापन सेवा अॅपमध्ये तपशील अपलोड करून तयार केला पाहिजे. रोख रकमेची जुळवाजुळव करण्यासाठी प्राप्तीकर विभागाने नोंदी जुळवल्या संदर्भात बँकांनी ही रोकड त्यांच्या मालकीची नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे विभागातील एका सूत्राने सांगितले की, बँकांनी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी ज्या वाहनात पैसे पाठविले होते, ते वेगळे होते. या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली असून तपास केला जात आहे.
पुढील कारवाईकडे लागले नागरिकांचे लक्ष
निवडणुकीच्या वेळी 50 हजार रुपयांपासून ते 1 कोटीहून अधिक रोख रकमेची वाहतूक करण्यास मनाई होती. त्यामुळे कॅश व्हॅनच्या तपासणीत 1 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. घटनास्थळी कॅश व्हॅन चालकाने ही रक्कम बँकेची असल्याचे नमूद केले. मात्र, आता बँकेने ही रक्कम प्राप्तीकर विभागासमोर नाकारली आहे. त्यामुळे आता कॅश व्हॅन चालकाची भूमिका संशयास्पद बनली.
आता थेट बेहिशेबी पैसे वाहून नेण्यासाठी एटीएम कॅश लोडिंग व्हॅनचा संभाव्य गैरवापर हे प्रकरण दर्शवित आहे. या प्रकरणात कॅश व्हॅन ऑपरेटरकडून एवढी मोठी रक्कम कोणासाठी पोहोचविली जात होती, हे पाहावे लागेल. रोखीचा मालक कोण आहे आणि कॅश व्हॅन ऑपरेटर कोणासाठी काम करीत होता? या तपासाबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून सदर प्रकरण पुढे काय वळण घेते? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.