महाराष्ट्र

Assembly Election : महाराष्ट्रात प्रचार, गडकरींचाच आधार

Nitin Gadkari : गुरुवारपासून धडाका; महाराष्ट्र पिंजून काढणार

Nagpur Constituency : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच तसे तर प्रचाराचे नारळ फोडले आहे. पूर्व, मध्य आणि दक्षिण नागपुरात त्यांनी निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन केले आणि एकाच दिवशी सलग तीन सभाही घेतल्या. आता मात्र अख्खा महाराष्ट्र ते पिंजून काढणार आहेत. गुरुवारपासून त्यांचा दौरा सुरू होईल आणि पुढील आठ दिवसांत 50 हून अधिक सभा होतील. विशेष म्हणजे महायुतीला लोकसभेत बसलेला फटका बघता गडकरींच्याच आधाराने महाराष्ट्रात प्रचार करण्यावर आता भर असणार आहे.

लोकसभेत पराभव

लोकसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीतील तिन्ही पक्षांची दाणादाण उडाली. विदर्भात तर गडकरी वगळता एकाही भाजप नेत्याला विजय मिळवता आला नाही. महाराष्ट्रात तर एक खासदार असलेली काँग्रेस 13 वर पोहोचली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचे टेंशन वाढले. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत एनडीएला देशात डंका पिटण्यासाठी महाराष्ट्राचा मोठा आधार मिळाला होता. मात्र, 2024 मध्ये त्याच्या आसपासही पोहोचता आले नाही. अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे हे घडल्याचे बोलण्यात आले. तर कुणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मतदान झाल्याचे म्हणाले. मात्र, आता यातून सुवर्णमध्य काढण्यासाठी नितीन गडकरींवर प्रचाराची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गडकरी यांचा झंझावाती दौरा 7 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागांत गडकरी यांच्या तब्बल 50 जाहीरसभा होतील. प्रदेश भाजपने गडकरी यांच्या प्रचार दौऱ्यास अंतिम स्वरूप दिले आहे. त्यांच्यासोबत भाजप आणि महायुतीचे अन्य ज्येष्ठ नेते प्रचारात सहभागी होतील. तसेच 16, 17 आणि 18 नोव्हेंबर 2024 या काळात अर्थात निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात देखील गडकरी यांच्या प्रचार सभांचे नियोजन केले जात आहे.

Sudhir Mungantiwar : दुचाकीवर निघाले सुधीर मुनगंटीवार!

विनंती

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विधानसभेसाठी गडकरींशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट बजावले होते, अशी चर्चा होती. मात्र त्यानंतर काहीच दिवसांत महाराष्ट्राच्या प्रचाराची जबाबदारी घ्यावी, अशी विनंती गडकरींना करण्यात आली. ती त्यांनी स्वीकारली आहे आणि प्रत्यक्ष मैदानात देखील उतरले आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!