महाराष्ट्र

Assembly Elections : अमित शाहांच्या बैठकीत ठरणार जागावाटपाचा फॉर्म्युला!

Mahayuti Politics : दोन दिवसांचा मुंबई दौरा रविवारपासून

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारपासून (8 सप्टेंबर) दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्य अमित शहांची रविवारी रात्री महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीचा जागा वाटपाचा फार्मूला ठरणार असल्याचे बोलले जात आहे. सह्याद्री अतिथिगृहावर रात्री होणाऱ्या या बैठकीत महायुतीचे दिग्गज नेते सहभागी होणार आहे.

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह महायुतीचे महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत. बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेही उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीत राजकीय खलबतं होत आहे. अशात अमित शाहांच्या आगमनानंतर विधानसभेच्या जागावाटपासह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणूक ऑक्टोबर 2019 मध्ये झाली होती. या विधामसभेचा कार्यकाळ संपत आला आहे. अद्याप निवडणुकीची घोषणा झाली नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी निवडणुका होणार की नंतर होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असले तरी महायुतीने तयारी सुरू केली आहे. किंबहुना जागा वाटपाने महायुतीत सुरू खलबतं थांबविण्यासाठी अमित शाहांचा दौरा असल्याचे राजकीय जाणकार म्हणत आहेत.

भाजप यंदाही मोठा भाऊ

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभ निवडणुकीतही भाजप मोठ्या भावाची भूमिका निभावणार आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांपेक्षा जास्त जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजप सर्वाधिक आमदार असलेला पक्ष आहे. भाजपकडे 105 आमदार आहेत. महायुतीत भाजपसोबत अजित पवारांची राष्ट्रवादीची काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे दोन पक्ष सामिल झाले आहे.

ही बैठक महत्त्वाची

अमित शाहांची महायुतीच्या नेत्यांसोबतची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला ठरणार आहे. अमित शाहा मुंबईच्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांना जागावाटपात समजुतदारीने वागण्याचा सल्ला देतील, असे बोलले जात आहे. माहितीचा फॉर्मुला लवकरच समोर येणार असल्याचे कळते आहे. त्यामुळे या बैठकीवर इतर पक्षांचे नेते सुद्धा छुप्या रुपात लक्ष ठेवून असणे सहाजिक आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!